मुंबई :टीव्ही स्टार कपल गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी यांनी त्यांच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. गौतम रोडेची पत्नी अभिनेत्री पंखुरी अवस्थी हिने जुळ्या मुलांना २५ जुलै २०२३ रोजी जन्म दिला आहे. टीव्ही जगतामधून अनेक अभिनेत्री आई झाल्याच्या बातम्या आपल्या चाहत्यासोबत शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी टीव्ही स्टार अभिनेत्री दीपिका कक्कर, सना खान आणि इशिता दत्ता यांच्या आई झाल्याच्या बातम्या या सोशल मीडियाद्वारे पसरत होत्या. दरम्यान आता गौतम आणि पंखुरीने ही बातमी देऊन चाहत्यांना खूश केले आहे. पंखुरीने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना जुळी मुले झाल्याची बातमी दिली आहे.
स्टार कपलने पोस्टमध्ये काय लिहले :या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, चार लोकांचे कुटुंब, तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी कृतज्ञ, आम्हाला जुळी मुले झाली आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, दोघांचा जन्म २५ जुलै २०२३ रोजी झाला. ही पोस्ट समोर आल्यानंतर त्यांचे अनेक चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.
चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा : या जोडप्याचे अभिनंदन करताना टीव्ही अभिनेत्री देवोलीनाने लिहिले आहे, 'अभिनंदन'. तर या पोस्टवर लाफ्टर क्वीन भारती सिंगने अभिनंदन करून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय दिव्यांका त्रिपाठीने या पोस्टवर लिहिले आहे, 'तुम्हा दोघांचे अभिनंदन'. तसेच ये 'रिश्ता क्या कहलाता है' फेम स्टार मोहसिन खानने लिहिले, 'मुबारक हो जी'. यासोबतच रोहित पुरोहित, शीना बजाज, चारू मलिक यांच्यासह अनेक स्टार्सनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
गौतम आणि पंखुरीचं लग्न कधी झाले : गौतम आणि पंखुरी यांनी २०१८मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ५ वर्षानंतर गौतम आणि पंखुरी पहिल्यांदाच आई-वडील झाले आहेत. पंखुरी रझिया सुलताना, गुर से मीठा इश्क, सूर्य पुत्र कर्ण या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. दरम्यान गौतम रोडे हा चित्रपट आणि टीव्ही मालिकेत काम करतो. गौतमने सरस्वती चंदन, सूर्यपुत्र कर्ण यांसारख्या मालिकांसह अक्सर २ आणि स्टेट ऑफ सीज टेंपल अटॅक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा :
- Jaya Bachchan returns: पापाराझींवर भडकल्या मॅडम, नेटिझन्स म्हणतात 'जया बच्चनको इतना गुस्सा क्यूँ आता है?'
- Varun Dhawan with Atlee : अॅटली कुमारच्या आगामी मास अॅक्शन एन्टरटेनर चित्रपटात वरुण धवन
- RARKPK Premiere : 'रॉकी और रानी...'च्या प्रीमियरला दीपिका पदुकोण अनुपस्थित; चाहत्यांना पडले प्रश्न....