मुंबई:अभिनेता पंकज त्रिपाठी ( Actor Pankaj Tripathi ) 'फुक्रे'च्या ( fukrey-3 ) पुढच्या भागाचे शूटिंग दिल्लीत करत आहे. शूटिंग दरम्यान, त्यांनी सेटवरुन वेळ काढून भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी खरगपूरला भेट ( IIT Kharagpur Visit ) दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक विशेष प्रेरक भाषण ( Motivational speech ) केले.
पंकज यांनी आजच्या काळात शिक्षणाचे असलेले महत्त्व सांगितले. सर्व विद्यार्थ्यांसाठी जीवन आणि करिअरची उद्दिष्ट्ये याबाबत विचारांची स्पष्टता असली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. पंकज म्हणाले की, भारतातील अशा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत ( Prestigious educational institutions in India ) भाषण करणे हा सन्मान आहे. ते खरोखर माझ्यासाठी मायने राखते. तरुण मनांना प्रेरित करणे हे कोणासाठीही नेहमीच आव्हानात्मक काम असते. विशेषतः ज्या प्रकारची पिढी सोबक आम्ही काम करत आहोत. आजकालच्या बहुतेक मुलांना आयुष्यात काय हवंय हे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त अनुभवातून तुमचे शिक्षण देऊ शकता.