मुंबई Panchak movie Trailer out :अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने यांचा 'पंचक' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट अनेकजण उत्सुकतेनं पाहात आहेत. 'पंचक' चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला चाहत्यांनी खूप पसंत केलं होतं. माधुरीनं या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी केली आहे. 'पंचक' हा चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकजण चित्रपट हिट होणार असल्याचं म्हणत आहेत.
कसा आहे 'पंचक'चा ट्रेलर :'पंचक' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला चित्रपटातील काही कलाकार धावताना दिसत आहेत. त्यानंतर एका कुटुंबातील व्यक्तीचं अचानक निधन होतं. या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला पंचक लागतो असं सांगण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता विद्याधर जोशी हे पंचक लागणे म्हणजे काय असते? याचा अर्थ सांगत आहेत. 'पंचक' लागलं म्हणजे एखाद्याच्या मृत्यूच्या घटकेपासून एका वर्षाच्या आत कुटुंबातील किंवा जवळचे पाच मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यानंतर हे ऐकल्यानंतर कुटुंबातील सर्वच व्यक्ती घाबरतात.