महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पाक क्रिकेटर नसीम शाहने उर्वशी रौतेलाला केले इन्स्टाग्रामवर फॉलोनंतर अनफॉलो - टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ

आशिया कप 2022 मधून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. असं वृत्त आहे की नसीम शाह उर्वशीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होते आणि नंतर काही वेळाने उर्वशीने याचा खुलासा केला.

उर्वशी रौतेला आणि पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह
उर्वशी रौतेला आणि पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह

By

Published : Sep 13, 2022, 3:51 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह यांची कहाणी आशिया चषक 2022 पासून थोडी पुढे सरकली आहे. आदल्या दिवशी नसीम शाहने उर्वशीला ओळखण्यास नकार दिला होता आणि आता या वेगवान गोलंदाजाने अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. नसीम शाहच्या इंस्टाग्रामवरून समोर आलेल्या मीम्सच्या स्क्रीनशॉटमध्ये हे दिसत आहे.

नसीम शाहने उर्वशी रौतेलाला केले इन्स्टाग्रामवर फॉलोनंतर अनफॉलो

नसीम शाहने उर्वशीला आधी इन्स्टाग्रामवर फॉलो केले आणि नंतर तिला अनफॉलो केल्याचे दाखवण्यात आले आहे. खरं तर, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात आशिया कपमधील व्हिडिओपासून झाली आहे, जो उर्वशीने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला होता.

आशिया कपमध्ये उर्वशीने टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतची खिल्ली उडवली आणि दुसरे म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहसोबत तिचे नाव जोडले गेले. आशिया कप 2022 दरम्यान, उर्वशीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता.

नसीम शाहने उर्वशी रौतेलाला केले इन्स्टाग्रामवर फॉलोनंतर अनफॉलो

या व्हिडिओमध्ये स्टेडियममध्ये बसलेली उर्वशी हसत आहे, तर दुसऱ्या बाजूला नसीम शाहही स्टेडियमकडे पाहून हसत आहे. आता हा व्हिडिओ एडिट केला आहे जणू दोघेही एकमेकांकडे पाहून हसत आहेत. जेव्हा उर्वशीने हाच व्हिडिओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला तेव्हा तो रातोरात व्हायरल झाला.

नसीम शाह यांना या व्हिडिओबद्दल विचारले असता, या गोलंदाजाने उर्वशीला ओळखण्यास स्पष्ट नकार दिला. उर्वशी रौतेला नावाच्या मुलीला ओळखत नसल्याचे नसीमने सांगितले. सध्या त्याचे लक्ष त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर आहे आणि त्याला फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करायचे आहे, असे तो म्हणाला.

नसीम शाहने उर्वशी रौतेलाला केले इन्स्टाग्रामवर फॉलोनंतर अनफॉलो

नसीमच्या या वक्तव्यानंतर उर्वशीने तिच्या इन्स्टास्टोरीवर आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये अभिनेत्रीने लिहिले की, ''काही दिवसांपूर्वी माझ्या टीमने काही फॅन्सचे एडिट व्हिडिओ शेअर केले होते. टीमने इतर लोकांच्या (म्हणजे नसीम शाह) नकळत ते शेअर केले होते. प्रसारमाध्यमांना विनंती आहे की, याबाबत कोणतेही वृत्त चालवू नये. तुम्हा सर्वांचे आभार आणि खूप प्रेम.''

हेही वाचा -बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रची परीक्षा, चौथ्या दिवसाखेर २५० कोटीकडे वाटचाल

ABOUT THE AUTHOR

...view details