महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pahlaj Nihalani visits Sai Temple : पहलाज निहलानी साई चरणी नतमस्तक, 'अनारी इज बॅक'च्या यशासाठी केली प्रार्थना

Pahlaj Nihalani visits Sai Temple : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांनी शिर्डीतील साई समाधीला भेट देऊन दर्शन घेतलं. त्यांचा 'अनारी इज बॅक' हा नवीन चित्रपट येत्या 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतोय, त्याच्या यशासाठी साईचरणी प्रार्थना केली.

Pahlaj Nihalani visits Sai Temple
पहलाज निहलानी साई चरणी नतमस्तक

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 3:48 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) - Pahlaj Nihalani visits Sai Temple : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी निर्मिती करत असलेला 'अनारी इज बॅक' हा नवीन चित्रपट येत्या 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतोय. त्या आधी पहलाज निहलानी आणि यातील अभिनेत्री मिसीका चौरसीया यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी 'अनारी इज बॅक' या चित्रपटाचे पोस्टरही साई चरणी लावत चित्रपटाच्या यशासाठी साईंना साकड घातलंय.

पहलाज निहलानी साई चरणी नतमस्तक



साईबाबांच्या दर्शनानंतर पहलाज निहलानी यांनी साईबाबा मंदिर परिसरात यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना निहलानी म्हणाले, 'साईबाबांचा दर्शनासाठी 1960 पासुन शिर्डीत येतोय. येत्या 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'अनारी इज बॅक' या चित्रपटाचा यशासाठी साईबाबांना आज प्रार्थना करण्यासाठी आलोय. मी आज पर्यंत जेवढेही चित्रपट बनवलेत, ते सर्व चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यांचे रील किंवा पोस्टर घेवून साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. त्या सर्व चित्रपटांना चांगलं यश मिळालंय. आजही 'अनारी इज बॅक' या चित्रपटाचा यशासाठी साईबाबांना प्रार्थना केलीय. नक्कीच या चित्रपटाला साईबाबांच्या आशीर्वादानं चांगले यश मिळणार आहे.'

अनारी इज बॅक


ओटीटीवर जे काही दाखवलं जातय त्यावर लोक समाधानी नाहीयेत. ओटीटी सारखे अनेक माध्यम आणि प्लॅटफॉर्म आले आणि थोडे दिवस चालले. Youtube आले त्यावेळी सर्वाना वाटत होते की फिल्म इंडस्ट्री संपंल. मात्र असं काही नाही थोडे दिवस ही माध्यम चालतात आणि पुन्हा मागे पडतात. चित्रपट हा अंधारात बनतो. तो चित्रपट अंधाऱ्या चित्रपटगृहात पाहण्यात जी गंमत आहे ती मजा इतर माध्यमांवर पाहण्यास येत नाही. यामुळे ओटीटीचा कुठलाही परिणाम चित्रपटगृहावर पडणार नसल्याचंही पहलाज निहलानी यावेळी म्हणाले आहे. सरकार एकच आहे, मात्र सरकार डबल चाल खेळतय. ओटीटीवर चित्रपट दाखवण्यासाठी प्रमाणपत्र लागत नाही पण तेच चित्रपटग्रहावर दाखवण्यासाठी सेन्सॉरशिप लागते. हे सगळे चुकीचे सुरू असल्याची खंत यावेळी पहलाज निहलानी यांनी व्यक्त केली आहे.

अनारी इज बॅक मोशन पोस्टर

ABOUT THE AUTHOR

...view details