महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

AR Rahman : चेन्नई लाईव्ह कॉन्सर्टबाबत चाहत्यांनी केली तक्रार ; संगीतकार ए.आर. रहमानचं ट्विट झालं व्हायरल...

AR Rahman Chennai concert : आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमानच्या चेन्नई लाईव्ह कॉन्सर्टबाबत अनेकजण तक्रार करत आहेत. या कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना अनेक समस्यांला सामोरं जावं लागलं. दरम्यान आता याप्रकरणी रहमाननं एक्सवरून एक पोस्ट केली आहे.

AR Rahman
एआर रहमान

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 4:05 PM IST

Updated : Sep 11, 2023, 4:21 PM IST

मुंबई - AR Rahman : ऑस्कर विजेता संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान संगीत जगतातील एक मोठं नाव आहे. ए आर रहमान याच्या चेन्नईतील लाईव्ह कॉन्सर्टबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. चेन्नईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ए.आर. रहमानच्या कॉन्सर्टमधल्या गचाळ नियोजनाबद्दल चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमादरम्यान बरीच बाचाबाची झाली आणि आता सोशल मीडियावर लोक आयोजकांवर टीका करत आहेत. याशिवाय काही लोकांनी आता रहमान याच्यावरही राग काढला आहे.

सदोष व्यवस्थापनामुळे अडचणी वाढल्या :गेल्या रविवारी चेन्नईमध्ये रहमानचा लाइव्ह शो होता. या शो वाट चाहते खूप आतुरतेने पाहत होते. या कार्यक्रमामध्ये चाहत्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. रहमानच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी सांगितलं की, कार्यक्रमाला आलेल्या अनेकांनी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती अनुभवली. काही लोकांनी आयोजकांवर कार्यक्रमात प्रवेश न दिल्याचा आरोप केला. काहींनी सांगितले की, आवाज खूपच कमी होता आणि स्टेज दूर असल्यानं गाणी व्यवस्थित ऐकू येत नव्हती. अनेकांकडे प्रवेश पास असूनही त्यांना आत जाऊ दिलं नाही. याशिवाय या कार्यक्रमात पार्किंगची योग्य सोय केली नव्हती.

तिकिटाचे पैसे मिळतील का? :कॉन्सर्टमधील असा गोंधळ पाहून सोशल मीडियावर लोकांनी आयोजक आणि एआर रहमानवर संताप व्यक्त केला. एका यूजरनं लिहिलं, 'रहमाननं लोकांना दिलेली सर्वात वाईट भेट.' दुसर्‍या यूजरनं लिहिलं की, 'पैसा आणि ऊर्जेचा अपव्यय. आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. दरम्यान ए.आर. रहमानने 'एक्स' वर पोस्ट केलीय. या कार्यक्रमात प्रवेश नाकारलेल्या लोकांना तिकिटाचे पैसे परत केले जातील. 'तुमच्यापैकी ज्यांनी तिकिटं खरेदी केली आहेत आणि दुर्दैवी परिस्थितीमुळे प्रवेश करू शकले नाहीत, कृपया तुमच्या तक्रारींसह तिकिटाची एक प्रत माझ्या साईटवर शेअर करा. आमची टीम शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देईल. असं रहमानने दिलंय.

हेही वाचा :

  1. Jawan box office collection day 5: शाहरुख खान स्टारर 'जवान' 300 कोटींचा टप्पा पार करणार...
  2. Priyanka chopra and preity zinta : प्रिटी झिंटा आणि प्रियांका चोप्रा जोनास ब्रदर्स कॉन्सर्टमध्ये मस्ती करताना झाल्या स्पॉट...
  3. Special screening of Jawan : दिग्दर्शक अ‍ॅटलीनं देशाच्या खऱ्या 'जवान'साठी केलं स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन....
Last Updated : Sep 11, 2023, 4:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details