महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

RagNeeti first pictures from wedding : परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांचे लग्नातील सुंदर फोटो, नवविवाहितांवर खिळल्या नजरा - नवविवाहित परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा

RagNeeti first pictures from wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्नाचे पहिले फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाले आहेत. राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये 24 सप्टेंबर रोजी झालेल्या एका शाही विवाह सोहळ्यात या जोडप्याने लग्नगाठ बांधली.

RagNeeti first pictures from wedding
परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांचे लग्नातील सुंदर फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 12:51 PM IST

मुंबई- RagNeeti first pictures from wedding : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाले आहेत. या दोघांचा राजस्थानमधील उदयपूर शहरातील लीला पॅलेसमध्ये विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यातील फोटोंची स्ट्रिंग सोशल मीडियावर शेअर झाली आहे. यात दोघेही नवविवाहित आनंदी आणि उत्साही मुडमध्ये दिसत आहेत.

सोमवारी फोटो शेअर करताना परिणीतीने इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली आहे. तिनं म्हटलंय, 'ब्रेकफास्टसाठी टेबलवरील गप्पांपासूनच आमची मनं कळत होती. खूप दिवसापासून या दिवसाची प्रतीक्षा करत होतो. अखेर मिस्टर आणि मिसेस होऊन धन्य पावलो. एकमेकांशिवाय जगणे शक्य नव्हतं...आता कायमसाठीचं जगणं सुरू होतंय.'

आयव्हरी रंगाच्या पोशाखात नवविवाहित जोडपे खूपच सुंदर दिसतंय. वधू परिणीतीच्या मिनिमलिस्टिक मेहेदी डिझाइन, गोल्डन कलीरा आणि गुलाबी चुरा घातलेल्या सजलेल्या हातांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यानवर बनलेला राघव चड्ढा हस्तिदंती शेरवानी आणि मॅचिंग सफामध्ये अतिशय सुंदर दिसत होता. आधी कळवल्याप्रमाणे, परिणीतीच्या लग्नाचा पायघोळ कूटरियर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केला आहे. तर राघवचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवाने त्याच्या विवाहासाठी स्टाईल केली आहे.

24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत या जोडप्याने लग्न केले. लंडनमध्ये एकत्र शिकलेले परिणीती आणि राघव नंतर एका पंजाबी चित्रपटाच्या सेटवर भेटले होते तेव्हा ते प्रेमात पडले होते. त्यानंतर हे दोघे काही काळ डेटिंग करत होते. गेली काही महिने त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली होती. गेल्या 13 मे रोजी दोघांचा साखरपुडा समारंभ दिल्लीत थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्यासह दिग्गज राजकारण्यांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाला परिणीतीची चुलत बहिण आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा खास अमेरिकेहून आली होती. परिणीती आणि राघव चड्ढा यांनी आपल्या नवीन आयुष्याला सर्वांच्या साक्षीनं सुरुवात केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details