महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 17, 2022, 3:04 PM IST

ETV Bharat / entertainment

ऑस्कर पुरस्कार 2023 च्या अंदाज यादीमध्ये रामचरण आणि ज्यू. एनटीआरचा होऊ शकतो विचार

ऑस्कर पुरस्कार 2023 च्या अंदाज यादीमध्ये एसएस राजामौली यांच्या RRR ला 2023 अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर, सर्वोत्कृष्ट मूळ गाणे (दोस्ती) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या तीन श्रेणींमध्ये नामांकन मिळू शकते. सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी राम चरणचा विचार होऊ शकतो हे समजताच स्टार्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारले आहे.

ऑस्कर पुरस्कार 2023
ऑस्कर पुरस्कार 2023

मुंबई - ऑस्कर पुरस्कार 2023 च्या अंदाज यादीमध्ये अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआरचे नाव असल्याचे समजताच दोघाही स्टार्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारले आहे. व्हेरायटी या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय मासिकाने भाकीत केले आहे की एसएस राजामौली यांच्या RRR ला 2023 अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर, सर्वोत्कृष्ट मूळ गाणे (दोस्ती) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या तीन श्रेणींमध्ये नामांकन मिळू शकते. राम चरणचा आरआरआर सह कलाकार ज्युनियर एनटीआरचा देखील ऑस्करच्या अंदाज यादीत उल्लेख आहे. अकादमीची अंतिम नामांकन यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

ही यादी बाहेर पडल्यानंतर लगेचच, राम चरणच्या चाहत्यांनी ट्विटरवर ‘राम चरण फॉर ऑस्कर’ हा हॅशटॅग ट्रेंड करून त्यांच्या लाडक्या स्टारची नवी ओळख साजरी करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले: “ऑस्करच्या रँकिंगच्या अंदाजांमध्ये सूचीबद्ध होणारा पहिला भारतीय अभिनेता. लोकांची मागणी, भारतीय सिनेमाचा अभिमान #रामचरण ऑस्कर #RamCharanForOscars #RRRMovie."

मॅंडी (2018) आणि द विचर: ब्लड ओरिजिन (2022) या हॉलिवूड साठी ओळखले जाणारे दिग्दर्शक-लेखक आरोन स्टीवर्ट आह्न यांनी ट्विटरवर राम चरणसाठी चित्रपट लिहिण्याची इच्छा व्यक्त व्यक्त केली होती. “राम चरण सारख्या ग्रेट अॅक्टरसाठी चित्रपट लिहायला आवडेल. पण त्याने जर आंतरराष्ट्रीय प्रॉडक्शनसाठी काम करायचे असेल तर त्याने मुख्य अभिनेता म्हणून केले पाहिजे. अशी संधी सहसा हॉलिवूड देत नाही. मी इथे आणखी काही उत्कृष्ट भारतीय चित्रपटांसाठी आलो आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

जुलैमध्ये, डॉक्टर स्ट्रेंज आणि ड्यून सारख्या हॉलीवूड ब्लॉकबस्टर्सचे लेखक, जॉन स्पाइहट्स यांनी देखील आरआरआर चित्रपटाबद्दल त्यांचे विचार ट्विटरवर शेअर केले होते. जॉनने लिहिले होते, “होली हेल, आरआरआर. याआधी एका चित्रपटात इतके चित्रपट पॅक करण्याची हिंमत कोणी केली आहे? काय राईड आहे. इतक्या दिवसानंतरही मी त्याचाच विचार करतोय."

हेही वाचा -Prime Minister Narendra Modi Birthday: बॉलिवूड सेलेब्रिटींनी दिल्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details