मुंबई : 'मिशन इम्पॉसिबल' फ्रँचायझी, फास्ट अँड फ्युरियस मालिका आणि मार्वलचे सुपरहिरो चित्रपट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवूड चित्रपटांच्या यादीत आहेत, मात्र सध्या हॉलीवूड चित्रपट 'ओपनहायमर' हा जगभरात आपला डंका वाजवत आहे. ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट खूप जगभरात गाजत आहे. 'ओपनहायमर' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये खूप बघायला मिळत आहे. 'ओपनहायमर' हा चित्रपट २१ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात तीन दिवसांत ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि आगामी वीकेंडमध्ये हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा सहज पार करेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
ख्रिस्तोफर नोलनचे गाजलेले चित्रपट :हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व सामान्य चाहते आणि बॉलिवूड कलाकार चित्रपटगृहांध्ये जात आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अशी कमाई करत आहे की लॉकडाऊननंतर आलेले अनेक मोठे बॉलिवूड चित्रपटही अशी कमाई करू शकले नाहीत. ख्रिस्तोफर नोलनचे मागील चित्रपट 'टेनेट' 'डंकर्क' 'इंटरस्टेलर' आणि बॅटमॅन ट्रायलॉजी हे भारतीय प्रेक्षकांचे आवडते चित्रपट बनले आहेत. येणाऱ्या दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करेल हे नक्की. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे खूप आश्चर्यकारक आहेत.