मुंबई- बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्रींमध्ये परवीन बाबीचा समावेश होतो. आपल्या ग्लॅमरस स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी अमर अकबर अँथनी, दीवार, नमक हलाल, शान इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकांमध्ये चमकली. पडद्यावर अमिताभ बच्चनसोबत तिची जोडी प्रचंड लोकप्रिय होती.
आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९८३ साली परवीन बाबीने अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला व ती जगप्रवासाला निघाली. ह्यादरम्यान तिची मानसिक स्थिती काहीशी बिघडल्याच्या चर्चा देखील चालू होत्या. १९९० च्या दशकात ती एकटी पडत गेली व २००५ साली स्वतःच्या घरी तिचा मृत्यू झाला. तो दिवस होता २० जानेवारी २००५. खरंतर ती मरण पावली आहे हे तीन दिवसांनी कळाले. एका अपार्टमेंटच्या दाराबाहेर तीन दिवसांपासून वर्तमानपत्रे आणि दुधाची पाकिटे साचली होती. गेल्या तीन दिवसांपासून दरवाजाला कुलूप नव्हते की आतून कोणीही बाहेर आले नव्हते. शेजारी जमा झाल्यावर त्यांना संशय आला. दरवाज्याजवळ गेल्यावर कुजण्याच्या दुर्गंधीमुळे लोकांना परिस्थिती संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली.
पोलिसांनी दार उघडून आत गेले तेव्हाचे चित्र अतिशय भीषण होते. तिच्या काळातील सौंदर्यवान अभिनेत्री बेडवर मृत्तावस्थेत पडली होती. तिचे कुजत चालले होते. खोली पूर्ण दुरवस्थेत होती आणि पलंगाच्या बाजूला एक व्हीलचेअर पडलेली होती. मृतदेह सापडण्याच्या ७२ तास आधी परवीन बाबीचा मृत्यू झाला होता. कोणी नातेवाईक नव्हते, मित्र नव्हते, खबर घ्यायला कोणी नव्हते. परवीन बाबी यांच्या मृत्यूची बातमी समजताच इमारतीखाली मीडिया जमा झाला. पण तिच्या मृतदेहावर हक्क सांगू शकेल असा कोणीही नातेवाईक नव्हता. वयाच्या 50 व्या वर्षी सुंदर परवीन बाबी यांचा सडलेला मृतदेह सापडल्याची बातमी संपूर्ण देशासाठी अतिशय धक्कादायक होती.
उपासमारीने मृत्यू, पोस्टमॉर्टममध्ये अन्नाचे कोणतेही अंशही नव्हता - परवीन बाबीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आला. पोस्टमॉर्टममध्ये तिच्या पोटात अन्नाचा कणही सापडला नव्हता. ती कित्येक दिवस उपाशी होती. मात्र तिच्या शरीरात दारू आढळून आली. परवीनने मृत्यूपूर्वी ३-४ दिवसांपर्यंत काहीही खाल्ले नसल्याचे अहवालात उघड झाले.