महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

HBD Kamal Hasan : कमल हासन आणि मणिरत्नम ३५ वर्षानंतर बनवणार चित्रपट - उलगनायगन कमल हासन

सुपरस्टार कमल हासन आज आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कमल हासन तब्बल ३५ वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत चित्रपट करणार आहे. त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, कमलने मणिरत्नमसोबतच्या त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली ज्याचे तात्पुरते नाव KH234 असे आहे.

कमल हासन आणि मणिरत्नम
कमल हासन आणि मणिरत्नम

By

Published : Nov 7, 2022, 11:48 AM IST

चेन्नई- सुपरस्टार कमल हासन आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांचा १९८७ मध्ये नायकन हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर ३५ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. तमिळ सिनेमाचा उलगनायगन कमल हासन चित्रपट निर्माते मणिरत्नम KH234 नावाच्या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहे.

राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि मद्रास टॉकीज या बॅनरखाली कमल हासन, मणिरत्नम, आर. महेंद्रन आणि शिवा अनंत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उदयनिधी स्टॅलिनची रेड जायंट मूव्हीज हा चित्रपट सादर करणार आहे. या चित्रपटाचे तपशील गुलदसत्यात ठेवण्यात आले आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात कमल हासन म्हणाला की, ''मी या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. 35 वर्षांपूर्वी मी तितकाच उत्साही होतो, जेव्हा मी श्री मणिरत्नम यांच्यासोबत काम सुरू करणार होतो. आजही तशीच मानसिकता आणि उत्सह आहे. हीच उत्सुकता ए आर रहमान यांच्याबद्दलही आहे. उदयनिधी स्टॅलिनसोबत हा चित्रपट करण्यासाठीही उस्तुक झालो आहे.''

या सहकार्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, PS-1 च्या अतुलनीय यशात वावरत असलेले मणिरत्नम म्हणाले, "कमल सरांसोबत पुन्हा सहयोग करण्यास आनंद, सन्मान आणि उत्साह आहे."

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, ''हा चित्रपट सादर करणे हा सन्मान आहे. "विक्रम' आणि बहुप्रतिक्षित ''इंडियन 2'' च्या उत्तुंग यशानंतर KH 234 सादर करण्यात कमल सर यांच्यासोबत सामील होण्याची ही एक चांगली संधी आहे. हा चित्रपट सादर करण्याचा आणि ही विशेष कथा सांगण्याचा पूर्ण सन्मान आहे." ते पुढे म्हणाले: "कमल सर आणि मणि सर हे जागतिक स्तरावर तामिळ चित्रपटसृष्टीचे अभिमान आहेत आणि मी या दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा निस्सीम प्रशंसक आहे. या उत्तम संधीसाठी कमल सरांचे आभार."

हेही वाचा -'आदिपुरुष'च्या टीमने घेतला सुधारण्याचा निर्णय, प्रदर्शनाची बदलली तारीख

ABOUT THE AUTHOR

...view details