महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Onkar Bhojane : जो नशिबालाही डावाववर लावतो तोच खरा गॅम्बलर, ओंकार भोजने 'सरला एक कोटी' मधून मुख्य भूमिकेत!

महाराष्ट्राची हास्यजात्रा या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला विनोदी कलाकार ओंकार भोजने (Onkar Bhojane) आता 'सरला एक कोटी'मध्ये (Sarala Ek Koti) एकदम हटके रोल साकारताना दिसणार आहे.

Onkar Bhojane
ओंकार भोजने

By

Published : Dec 14, 2022, 3:15 PM IST

मुंबई :ओंकारची (Onkar Bhojane) मुख्य भूमिका असलेला 'सरला एक कोटी' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ओंकार एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. कायम विनोदी भूमिकेत त्याला बघितल्यामुळे, आता या नवीन लूकची चर्चा होत आहे. हा चित्रपट नक्की काय आहे आणि ओंकारची त्यात काय भूमिका असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. छोट्या पडद्यावर आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन रोल बघायला मिळणार आहे. ओंकार भोजने आता मोठी स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे.

सरला एक कोटी


जो नशिबालाही डावाववर लावतो तोच खरा गॅम्बलर : 'सरला एक कोटी' या नावातच चित्रपटाचे वेगळेपण आहे. ओंकारच्या या पोस्टरमध्ये तो पैसे लाऊन पत्ते खेळताना दिसत आहे. समोर सिगरेटची थोटके आणी दारूची बाटली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला ओंकार एक बिधनास्त लूक देताना दिसत आहे. याशिवाय पोस्टरवर 'जो नशिबालाही डावाववर लावतो तोच खरा गॅम्बलर' असे लिहिलेले आहे. त्यामुळे पत्ते, दारूचा गुत्ता, सिगरेट, बिनधास्त हावभाव अशा सगळ्या गोष्टी आणि चित्रपटाचे नाव 'सरला एक कोटी' असल्याने चित्रपटाचा नक्की विषय काय, त्याची कथा काय आणि हे सगळे कधी उलगडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यातही ओंकारचे हे पोस्टर बघून अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे की, चित्रपटाच्या नावात असलेली 'सरला' कुठे आहे?



चित्रपट नवीन वर्षात सर्वत्र प्रदर्शित होईल : सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित 'सरला एक कोटी' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट 'आटपाडी नाईट्स'चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे असून, कार्यकारी निर्माते विनोद नाईक हे आहेत. 'सरला एक कोटी' हा ओंकार भोजनेचा नवीन चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details