मुंबई :अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला 'ओ माय गॉड २' या चित्रपटाला लोकांकडून खूप प्रशंसा मिळवत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला आहे की लोक अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या कथेबद्दल कौतुक करत आहे. दरम्यान आता अक्षयनेही त्याच्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. 'ओ माय गॉड २' या चित्रपटाची स्पर्धा थेट सनी देओलच्या 'गदर २'शी आहे. या स्पर्धेत 'ओ माय गॉड २' हा चित्रपट मागे असला तरीही या चित्रपटाची चर्चा ही सोशल मीडियावर खूप होत आहे. 'ओ माय गॉड २' या चित्रपटामधील अक्षयचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले आहे.
हर हर महादेव जयघोषणा : शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी अमित राय दिग्दर्शित 'ओ माय गॉड २' प्रदर्शित झाला. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी सारख्या दिग्गज कलाकार या चित्रपटात असल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार असे दिसत आहे. दरम्यान 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार भगवान शिवाचा दूत बनला आहे. अक्षयची व्यक्तिरेखा लोकांच्या मनाला भिडली आहे. अक्षय कुमारने हे पात्र सुंदरपणे साकारल्याबद्दल त्याचे चाहत्याकडून अभिनंदन होत आहे. अभिनंदनाचा वर्षाव करत चाहते त्याच्या फोटोवर पुष्पहार घालून केक कापून आणि दूध अर्पण करून आनंद व्यक्त करत आहे. सलग ७ चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर अक्षयचे नशीब 'ओ माय गॉड २' सोबत चमकताना दिसत आहे. यासोबतच मुंबईतील गॅलेक्सी थिएटरमध्ये हर हर महादेवच्या जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या आहेत .