मुंबई : अनेक वादांनी वेढलेला असूनही, अक्षय कुमार स्टारर 'ओ माय गॉड २' या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच पाठिंबा दिला आहे. हा चित्रपट २०२३ मधील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. 'ओ माय गॉड २' आणि 'गदर २' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी ११ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. 'ओ माय गॉड २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच सुरूवात केली. याशिवाय या चित्रपटाने वीकेंडला जोरदार कमाई केली आहे. 'ओ माय गॉड २' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी किती कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला. हे जाणून घेऊया...
'ओ माय गॉड २' ने रविवारी किती कमाई केली? :'ओ माय गॉड २' हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे . या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी, यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार या चित्रपटात भगवान शिवाच्या दूताच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट 'गदर २' आणि 'जेलर' या दोन मोठ्या चित्रपटांना टक्कर देत आहे, तरीही 'ओ माय गॉड २' चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असून या चित्रपटाने चांगले कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहेत.
'ओ माय गॉड २ चित्रपटाचे कलेक्शन
'ओ माय गॉड २' चित्रपटाचे ओपनिंग दिवसाचे कलेक्शन - रु. १०.२६ कोटी