मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि गरिबांचा मसिहा म्हटला जाणारा सोनू सूद लवकरच रोडीज या रिअलिटी शोच्या नवीन सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सोनूने ही माहिती काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती, ज्यामध्ये तो ऑन-ग्राउंड ऑडिशनची घोषणा करताना दिसला होता. सोनू सूदने काही तासांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीसोबतचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती सोनू सूदसाठी एक जुने गाणे गाताना दिसत आहे.
आजोबांनी पूर्ण केली सोनू सूदची फरमाईश- सोनू सूद अनेकदा सोशल मीडियावर सामान्य लोकांसोबत घालवलेले सुंदर क्षण शेअर करत असतो. त्याने रविवारी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये तो एका वृद्ध व्यक्तीला भेटतो. तो त्या व्यक्तीशी हस्तांदोलन करतो, त्यावर ते वृद्ध त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतात. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती सोनू सूदला भरभरुन आसीर्वाद देतो. त्यानंतर त्या वक्तीला एक गाणे गाण्याची फर्माइश सोनू करतो. त्यावर तो वृद्ध 'तेरे बिन नहीं जीना डोलना' (कच्चे धागे, 1996) ची धून गातो, जे ऐकून सर्वजण त्याची स्तुती करतात. त्यानंतर ते आजोबा, आजकल तेरे मेरे प्यार की चर्चा हर जबान पर हे गीत गातात.