महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Oh My God 2 Trailer Postponed : नितीन देसाईच्या निधनामुळे 'ओह माय गॉड २'चा ट्रेलर लांबणीवर - ट्रेलर रिलीज झाला पोस्टपोन

नितीन देसाईच्या निधनामुळे 'ओह माय गॉड २' चित्रपटाचा आज रिलीज होणारा ट्रेलर लांबणीवर पडला आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या निधनामुळे हा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. उद्या या ट्रेलरचे लॉन्चिंग होणार असल्याचे अभिनेता अक्षय कुमारने चाहत्यांना कळवले आहे.

Oh My God 2
ओह माय गॉड २

By

Published : Aug 2, 2023, 3:35 PM IST

मुंबई :अक्षय कुमार स्टारर 'ओह माय गॉड २' चित्रपट अखेर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या प्रमाणपत्राबाबत थोडीशी अडचण होती, पण आता ती दूर झाली आहे. आज 'ओह माय गॉड २'चा ट्रेलर रिलीज होणार होता, मात्र नितीन देसाईंच्या निधनामुळे 'ओह माय गॉड २' ट्रेलर रिलीज पुढे ढकलले गेले आहे. याबद्दल अक्षय कुमारने ट्रेलर रिलीज बद्दल माहिती देत लिहले , 'नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दु:ख झाले. प्रॉडक्शन डिझाईनमधील ते एक एक दिग्गज नाव होते आणि आमच्या चित्रपटसृष्टीचा एक मोठा भाग होते. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांसाठी काम केले. त्यांनी हे जग सोडून जाणे हे खूप मोठे नुकसान आहे. यामुळे त्यांना आदरांजली वाहताना आम्ही आज 'ओ माय गॉड २' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करत नाही आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या सकाळी ११ वाजता लॉन्च होईल. ओम शांती.', असे अक्षय कुमारने आपल्या ट्विटवर म्हटले आहे. 'नितीन देसाईच्या निधनामुळे अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार दु;खी आहेत. त्यामुळे 'ओ माय गॉड २' च्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकला 'ओह माय गॉड २' : प्रभास स्टारर आदिपुरुष या चित्रपटाच्या वादानंतर सेन्सॉर बोर्ड अत्यंत सावध आहे आणि त्यामुळेच सेन्सॉर बोर्डाने 'ओह माय गॉड २' ला प्रमाणपत्र देताना निर्मात्यांसमोर अनेक अटी ठेवल्या होत्या. असे म्हटले जात होते की निर्माते काही गोष्टीची सहमती दर्शवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही वाढवल्याच्या बातम्या येत होत्या. आता अखेर चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळाले आहे. दरम्यान अक्षयच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाच्या पोस्टवर त्याचे चाहते आधीच या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. काही जण तर हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार असल्याचेही सांगत आहेत.

'ओह माय गॉड २' आणि गदर २ चित्रपट : 'ओह माय गॉड २', आणि सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गदर २' चित्रपट एकाच दिवशी ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच लढत बघायला मिळणार आहेत. 'ओह माय गॉड २' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत यामी गौतम पंकज त्रिपाठी, परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात पंकज भगवान शिवाच्या निस्सीम भक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे, तर यामी एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे .या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. अक्षय कुमार चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहे. 'ओह माय गॉड २' चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details