महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aryan Khan Video  : व्हायरल व्हिडिओमध्ये आर्यन खान हसताना पाहून नेटिझन्सना आश्चर्य, म्हणाले, 'ये हसता भी है' - NMACC

अंबानी इव्हेंटमध्ये वडील शाहरुख खानच्या डान्स परफॉर्मन्सवर आर्यन खानच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन हसताना दिसत आहे जे नेटिझन्सच्या मते दुर्मिळ दृश्य आहे.

आर्यन खान हसताना पाहून नेटिझन्सना आश्चर्य
आर्यन खान हसताना पाहून नेटिझन्सना आश्चर्य

By

Published : Apr 3, 2023, 7:49 PM IST

मुंबई - मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या लॉन्चिंगचा आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असलेल्या या क्लिपमध्ये आर्यन त्याचे सुपरस्टार वडील शाहरुख खानच्या स्टेजवरील परफॉर्मन्सचा आनंद घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

झुमे जो पठाणवर थिरकला शाहरुख खान - आर्यन, त्याची आई गौरी खान आणि बहीण सुहाना खानसह कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. बॉलिवूडमधील दिग्गजांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये शाहरुख खान झूमे जो पठाण गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अल्पावधीतच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर्यन आपल्या वडिलांचा परफॉर्मन्स पाहून स्मित करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुखचा २५ वर्षीय मुलगा हसताना पाहून नेटिझन्सचा अविश्वास बसला आहे. आर्यनचे हसणे हे एक दुर्मिळ दृश्य असल्याचे नेटिझन्सचे मत आहे.

आर्यन खान हसताना पाहून अनेकांच्या प्रतिक्रिया- हलक्या मूडमध्ये आर्यनची झलक पाहून आश्चर्यचकित झालेल्या एका चाहत्याने विचारले, 'ये हसता भी है?' तर दुसरा म्हणाला, 'आर्यनला हसताना पाहून खूप बरं वाटतं. त्याच्या वडिलांना नाचताना आणि लोकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेताना पाहणं हा त्याच्यासाठी अभिमानाचा क्षण असावा.' दुसर्‍याने लिहिले, 'व्वा थांबा मला विश्वास बसत नाही. आर्यन हसत आहे का??? आणि SRK च्या परफॉर्मन्सवर हसत आहे. डे बनवला आहे त्याने.' गेल्या बऱ्याच महिन्यापासून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आर्यनच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले आहे. इतक्या कमी वयात त्याच्यावर ओढवलेल्या प्रसंगाने शाहरुखनेेही मीडियापासून अंतर राखणे पसंत केलंय.

सोशल मीडियामध्ये आर्यन खान- NMACC गालाच्या गुलाबी कार्पेटवरील व्हिडिओमध्ये, आर्यन आपल्या धाकट्या बहिणीपासून अंतर राखताना दिसला होता आणि कंबरेभोवती हात बांधला होता. तथापि, त्याच्या हावभावाने एक शीष्ठ ल्यक्ती असल्याचे सोशल मीडियाला वाटले कारण अनेकांना असे वाटले की तो 'अत्यंत औपचारिक' आहे तर काहीजण आर्यनचा 'उत्कृष्ट स्टारकीड' म्हणून बचाव करीत आहेत. परंतु त्याचे इन्स्टाग्राम तपासले तर तो अत्यंत चपळ आणि हसता खेळता मुलगा आहे हे लक्षात येते.

हेही वाचा -Janhvi Kapoor Wishes Shikhar Pahariya : जान्हवी कपूरने कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details