महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Varun and lavanya marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर - चिरंजीवी यांनी शेअर केली फोटो

varun tej and lavanya marriage : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांच्या लग्नाची फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्यावर अनेकजण अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत.

Varun and lavanya marriage
वरुण आणि लावण्यचे लग्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 12:28 PM IST

मुंबई - varun tej and lavanya marriage : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी बुधवारी विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. याशिवाय स्टार पाहुण्यांच्या यादीत राम चरण आणि अल्लू अर्जुन यांचा देखील समावेश होता. 1 नोव्हेंबर रोजी इटलीतील टस्कनी येथील बोर्गो सॅन फेलिस येथे हा लग्न सोहळा पार पडला. या जोडप्यानं हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सनी वधू-वरांना आशीर्वाद दिला. दरम्यान या नवविवाहित जोडप्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या फोटोवर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. वरुण तेजचे स्टार वडील नागा बाबू कोनिडेला, मेगास्टार चिरंजीवी यांचे देखील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ते खूप खुश दिसत आहेत.

फोटो झाले व्हायरल :वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा फोटो शेअर करून, तेलुगू अभिनेता आणि निर्माता नागा बाबू कोनिडेला यांनी एक्सवर लिहलं, 'नवविवाहित जोडप्यासाठी, वरुण तेज कोनिडेला आणि लावण्यसाठी तुमचे आशीर्वाद मनापासून मागत आहेत. मुलाच्या लग्नाबद्दल अनेकांनी नागा बाबू यांचे अभिनंदन केले. याशिवाय काही चाहत्यांनी त्यांना आणखी फोटो शेअर करण्यास सांगितले आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत म्हटलं 'अभिनंदन!! वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी, तुम्हा दोघांनाही शुभेच्छा'. दुसऱ्या एकानं लिहलं, किती खास फोटो आहेत, खूप खूप शुभेच्छा. आणखी एकानं लिहलं, ही जोडी खूप सुंदर दिसत आहे. या पोस्टवर अनेकजण हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

चिरंजीवी यांनी शेअर केले फोटो : वरुणनं लग्नामध्ये सोनेरी शेरवानी आणि शॉल परिधान केली आहे, तर लावण्यानं लाल रंगाची साडी नेसली आहे. याशिवाय तिनं सोन्याच्या दागिने परिधान केले आहेत, ज्यात तिनं हार, बांगड्या, हात फुल, मांग पट्टी घातली आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. वरुण तेज हा ज्येष्ठ अभिनेता चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा भाचा आहे. अभिनेता अल्लू अर्जुन, राम चरण अल्लू सिरिश, साई तेज आणि पंजा वैष्णव तेज हे सर्व त्याचे चुलत भाऊ आहेत. नवविवाहित जोडप्याचं अभिनंदन करताना चिरंजीवी यांनी देखील काही फोटो एक्सवर शेअर केले आहेत.

हेही वाचा :

  1. SRK Birthday : मन्नत बाहेर दिवाळी : 'मी तुमच्या प्रेमाच्या स्वप्नात जगतो', म्हणत शाहरुखनं मानलं आभार
  2. Goa International Film Festival : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 'या' तीन मराठी चित्रपटांची निवड, जाणून घ्या चित्रपटांविषयी!
  3. Pippa trailer : ईशान खट्टरचा आगामी चित्रपट 'पिप्पा'चा ट्रेलर रिलीज; पाहा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

...view details