महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Emergency release postponed : इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, कंगना रणौतनं दिलं अपडेट - कंगना रणौत दिग्दर्शित इमर्जन्सी

Emergency release postponed : कंगना रणौत दिग्दर्शित 'इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्यात आली आहे. आता हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार असून रिलीजची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं कंगनानं सांगितलंय.

Emergency release postponed
इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 4:33 PM IST

मुंबई - Emergency release postponed :कंगना रणौत दिग्दर्शिन करत असलेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची फिल्म इंडस्ट्री आणि राजकीय पातळीवरही मोठी चर्चा आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिया गांधी यांनी 1975 मध्ये आणीबाणीची घोषणा केली होती. याच विषयावर आधारित इमर्जन्सी हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः कंगना रणौतनं इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. कंगनाने स्वतःच लिहिलेला हा चित्रपट यावर्षी 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र याच्या रिलीज तारखेत बदल झाल्याचे अपडेट कंगनानं सोशल मीडियावर दिलं आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं सांगितले की, तिच्या शुटिंग शेड्यूलमध्ये बदल केल्यामुळे तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'चं प्रदर्शन पुढील वर्षी पुढे ढकलण्यात आलं आहे.

कंगनानं लिहिलंय, प्रिय मित्रांनो, मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. इमर्जन्सी चित्रपट हा एक कलाकार म्हणून माझ्या संपूर्ण आयुष्यात सर्वाधिक शिकवणारा आहे. इमर्जन्सी हा केवळ माझ्यासाठी चित्रपट नाही तर माझ्या योग्यतेची आणि चारित्र्याची ही कसोटी आहे. आमच्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादामुळे आमच्या टीममधील सहकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालंय. माझे अंतःकरण कृतज्ञतेनं भरलेले आहे आणि मी जेथे जाते तेथे लोक मला इमर्जन्सीच्या रिलीजच्या तारखेबद्दल विचारत असतात. आम्ही 24 नोव्हेंबर 2023 ही इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीजची तारीख पूर्वी जाहीर केली आहे, परंतु माझ्या बॅक टू बॅक रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या यादीमुळे इमर्जन्सी चित्रपटाचं रिलीज 2024 मध्ये पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. रिलीजची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल.', असं कंगनानं म्हटलंय.

'इमर्जन्सी' चित्रपटाचा विषय हा राजकीय पार्श्वभूमी असलेला आहे. आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली होती. याकाळात लोकशाही मुल्ये पायदळी तुडवण्यात आल्याची टीका विरोधकांची होती. हा काळा लोकशाहीला बाधक होता असेच वर्णन आणीबाणीचं केलं जात. आता या विषयावर चित्रपट निर्मिती करुन पुन्हा एकदावातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अर्थात यापूर्वीही अनेक चित्रपटातून हा विषय हाताळण्यात आला होता. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणूका होणार असल्यामुळे 'इमर्जन्सी' चित्रपट पुढील वर्षी रिलीज केला जात असल्याचा अंदाजही यानिमित्तानं केला जाऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details