मुंबई - क्रिकेटर ऋषभ पंतसोबतच्या कथित संबंधानंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मीम्ससाठी भरपूर मटेरियल पुरवत राहिली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह प्रकरणाने क्रिकेट जगताशी तिच्या संबंधाला आणखी एक मनोरंजक वळण दिले असताना तिच्या गूढ पोस्ट आगीत तेल ओतणाऱ्या होत्या. चाहत्यांनी अनेकदा ऋषभला तिच्या नावाने चिडवले असताना आता एका व्हिडिओमध्ये क्रिकेटर अक्षर पटेलला एका चाहत्याने एका सामन्यादरम्यान उर्वशीचे नाव वापरून चिडवले आहे.
आयपीएल मैदानावर आडनाव चुकीचे घेणाऱ्यावर उर्वशीचा आक्षेप- शनिवारी उर्वशीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये एक क्रिकेट शौकीन आयपीएल सामन्यादरम्यान अक्षरची मस्करी करताताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू असलेला अक्षर पटेल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी उर्वशीचे नाव वापरून त्याच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत, त्याने उर्वशीचे आडनाव चुकीचे उच्चारले जे अभिनेत्री उर्वशीला अजिबात आवडले नाही. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना उर्वशीने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओतील व्यक्ती आपले आडनाव चुकीचे घेत असल्याबद्दल आक्षेप नोंदवला. तिने लिहिले की, माझ्या आडनावाला काहीही म्हणणे सोडून द्या. ते माझ्यासाठी मौल्यवान नाव आहे. रौतेला या शब्दाला अर्थ, सामर्थ्य आणि आशीर्वाद आहे.