मुंबई :बी-टाऊनमध्ये सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत असतात. विजय वर्माची कारकिर्दीची वाटचाल खूप प्रभावी आहे. 'डार्लिंग्ज', 'दहाड' आणि लस्ट 'स्टोरीज २' मधून त्याचे खूप कौतुक झाले. विजयने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. विजयला प्रामुख्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरून यश मिळाले. 'सुपर ३०' आणि 'बागी ३' यासारख्या चित्रपटामध्ये त्याने उत्तम अभिनय केला आहे. आता विजय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. याशिवाय विजयला तमन्नामुळे अनेकजण ओळखू लागले आहेत, त्यामुळे त्याचे चाहते देखील आता भरपूर आहेत.
विजय वर्माने केला खुलासा : तमन्ना भाटियासोबत विजयचा रोमँटिक चित्रपट आल्यानंतर चाहत्यांचे पूर्ण लक्ष आता त्याच्यावर आहे. दरम्यान एका मुलाखती दरम्यान विजयने सांगितले की, 'सर्वप्रथम माझ्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आम्ही डिमांडिंग जोडप्यापैकी एक आहोत. असे अनेकांना वाटते आणि हे खूप चांगले आहे. मी आधी एकटा फिरायचो आता माझ्यासोबत तमन्ना असते. आम्ही एकत्र फिरतो. आता आम्हाला प्रचंड लाईमलाईट मिळते. मला इतकी लाईमलाईटची सवय नाही. यासाठी मी आता प्रयत्न करत आहे'. असे त्याने मुलाखती दरम्यान सांगितले. दरम्यान विजय आणि तमन्ना २०२३ च्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात एकत्र होते. त्यामुळे या चर्चांना उधाण मिळाले.