मुंबई - ज्येष्ठ अभिनेता कमला हासन यांनी कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या निषेधाला पाठिंबा दर्शवला. यासाठी त्यांनी एक ट्विट करत कुस्तीपटूंना समर्थन दिले. यानंतर तमिळ गायिका चिन्मयी श्रीपादने आपल्यावर बंदी घालण्यात आली तेव्हा कमल हासन गप्प का होते अशी त्यांच्यावर टीका केली आहे.
कमल हासन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते, 'आज कुस्तीपटूंच्या विरोधाला १ महिना होऊन गेला. राष्ट्राच्या सन्मानासाठी लढणाऱ्यांना आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी लढण्यासाठी भाग पाडले आहे'. कमल हासन यांनी पुढे लििले की, 'भारतीय नागरिकांनो, आपण कुणाकडे लक्ष देण्यासाठी पात्र आहोत, आपले राष्ट्रीय क्रिडावीर की गुन्हेगारी इतिहास असलेले राजकारणी?'
कमल हासन यांच्या ट्विटनंतर गायिका चिन्मयी श्रीपादने एक ट्विट करत कमल हासन यांना काही प्रश्न विचारले आहेत. तिने लिहिले की, 'पाच वर्षापासून एक तामिळनाडूतील गायिकेवर बंदी आहे, कारण तिने लैंगिक शोषण करणाऱ्याचे बिंग फोडले होते. त्यावेळी कोणही ब्र काढला नाही. महिला सुक्षेवर भाष्य करणाऱ्यावर कोणी कसे विश्वास ठेवायचे, जेव्हा ते त्यांच्या नाकाखाली होत असलेल्या लैंगिक शोषणाकडे दुर्लक्ष करतात. आता माझ्या या पोस्टवर भरपूर शिव्या योतील, म्हणून मी जात आहे.'
गायिका चिन्मयी श्रीपादाने कमल हासनला त्याच्या ट्विटचा हवाला देऊन प्रश्न केला की, तिने तिच्यावर विनयभंग करणाऱ्याचे नाव देऊन तिला संगीत व्यवसायातून काढून टाकले. यावर हासन यांनी मौन बाळगत कधी प्रतिक्रिया का दिली नाही. गायिकाने सांगितले की, तमिळ गीतकार वैरामुथू यांनी व्यवसायाच्या भेटीदरम्यान तिचा लैंगिक छळ केला होता आणि भारतातील मी टू चळवळीदरम्यान ती गप्प न बसल्यास तिची कारकीर्द संपुष्टात आणण्याची धमकी दिली होती.
चिन्मय श्रीपाद मीटू चळवळीतील आरोप - चिन्मयी श्रीपाद या गायिकेने 2018 मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गोष्ट मीटू चळवळीच्या दरम्यान सांगितली होती. चिन्मयी ही तमिळा गायिकांमधील आघाडीची कलाकार आहे. जेव्हा ती आणि गीतकार वैरामुथू स्वित्झर्लंडमध्ये विझ्हामट्टॉम कॉन्सर्टसाठी गेले असताना 2005 मध्ये तिने त्याच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. वैरामुथूने दाव्यांवर विवाद करणारे विधान जारी केल्यानंतर, चिन्मयीने त्याला खोटारडे म्हणून प्रत्युत्तर दिले होते. वैरामुथू विरुद्धच्या दाव्यांमुळे चिन्मयीला दक्षिण भारतीय सिने, टेलिव्हिजन कलाकार आणि डबिंग आर्टिस्ट युनियनमधून बंदी घालण्यात आली होती. तिची मनाई अजून उठलेली नाही.