मुंबई- प्रसिद्ध नृत्यांगना आणि दिलबर गर्ल नोरा फतेहीसाठी 6 फेब्रुवारी हा दिवस खूप खास आहे. नोरा आपल्या किलर डान्स मूव्ह्सने चाहत्यांना घायाळ करत आहे. आजच्या दिवशी ती तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. नोरा ही एक परदेशी असून कॅनडातून काही रुपयांत कामाच्या शोधात मोठ्या आशेने भारतात आली होती आणि इथे तिचे नाणे चालले. आज भारतातून नोराला जी ओळख मिळाली आहे, त्यामुळे तिची जगभर प्रसिध्दी झाली आहे. नोरा बॉलीवूडमध्ये इतकी हिट होती की त्यामुळे तिला 'फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2022' मध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. नोराच्या या खास दिवशी आपण तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
नोरा फतेहीची डान्स स्पर्धक ते जज अशी प्रगती - नेरा फतेही ही कॅनेडियन अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त, नोरा एक सुंदर मॉडेल, उत्कृष्ट नृत्यांगना, निर्माता देखील आहे आणि विश्वास बसणार नाही, ती एक गायिका देखील आहे. भारतीय टेलिव्हिजनवरील आगामी डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून नोराला पहिली पसंती राहिली आहे. 2016 मध्ये ती 'झलक दिखला जा-9' या डान्सिंग शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. पण आज ती 'झलक दिखला जा-10'ची जज आहे. यासोबतच ती 'डान्स दिवाने ज्युनियर्स सीझन-1'ची जजही आहे.
इतका पैसा घेऊन भारतात प्रवेश केला होता- नोराचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 रोजी टोरंटो, कॅनडात मोरक्कनमध्ये राहणाऱ्या पालकांमध्ये झाला होता. नोराकडे भारतीय नागरिकत्व नाही. नोरा आपल्या देशातून मोठ्या कामाच्या शोधात भारतात आली होती. एका मुलाखतीत नोराने सांगितले होते की, ती 5,000 रुपये घेऊन भारतात आली होती आणि येथे आल्यानंतर तिने एका एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली. तिला इथे तीन हजार रुपये मिळायचे, त्यावर तिचा उदरनिर्वाह चालायचा.
वयाच्या १६ व्या वर्षापासून पडेल ते काम करते नेरा फतेही- नोराने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि वेट्रेस म्हणून काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोराने वयाच्या 16 ते 18 व्या वर्षी वेट्रेस म्हणून काम करायला सुरुवात केली होती. याचे कारण आर्थिक संकटाशी लढा देणे हे होते. एवढेच नाही तर नोराने एका कॉफी शॉपमध्येही काम केले. याशिवाय नोराने कॉल सेंटरमध्ये टेलिकॉलर आणि लॉटरी विकण्याचे कामही केले आहे.