रामपूर- warrant against Jaya Prada : चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. काही दिवसापूर्वी जया प्रदा यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं होतं. असं असूनही बुधवारी ती्या न्यायालयात पोहोचल्या नाहीत. न्यायालयानं आता त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माजी खासदार जया प्रदा यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलंय. या प्रकरणाची सुनावणी आता १७ नोव्हेंबरला होणार आहे.
जयाप्रदा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकीटावर रामपूरमधून लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांच्याविरुद्ध स्वार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उड्डाण पथकाचे प्रभारी डॉ. नीरजकुमार पराशरी यांच्या तक्रारीवरून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही 19 एप्रिल रोजी माजी खासदार जयाप्रदा यांनी रामपूरच्या नूरपूर गावात रस्त्याचं उद्घाटन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचा व्हिडिओही प्रसारित करण्यात आला.