मुंबई- नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर गालाच्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा स्टेजवर नृत्य करत असताना त्याचा आनंद गौरी खान घेताना दिसत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी, अभिनेत्री प्रियांका चोप्रा चित्रपट निर्माता करण जोहरला मिठी मारताना दिसली होती. दुसऱ्या दिवशी, प्रियंका तर रणवीर सिंगसोबत त्यांच्या दिल धडकने दो (२०१५) या चित्रपटातील गल्लन गुडिया गाण्यावर थिरकताना पाहताना गौरी खान चिअर्स करत होती.
प्रियांकावरुन करणवर टीका- बॉलिवूडमध्ये राजकारण असून त्यामुळेच प्रियंकाला देश सोडून हॉलिवूडची वाट धरायला लागली अशा प्रकारचा थेट आरोप कंगना रणौत आणि इतरांनी करण जोहरवर केला होता. या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या दिल धडकने दो सहकलाकार रणवीर सिंगसोबत स्टेजवर नाचताना दिसत आहे. रणवीरने तिच्या परफॉर्मन्सच्या शेवटी प्रियांकाच्या गालावर किस केले होते.
प्रियांकाचे नृत्य- गर्दीत उभं राहून प्रियांका आणि रणवीरचे नृत्य पाहणारी गौरी खानचा फोटो यात सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या जिवलग मैत्रिणी भावना पांडे आणि नीलम कोठारी सोनी होत्या. भूतकाळातील समस्या असूनही या प्रसंगी हा ग्रुप मजा करत असल्याचे दिसून आले.