मुंबई - मुंबईत शुक्रवारी रात्री नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. भारतातील संगीत, नाटक, सिनेमा, चित्रकला, तृत्यकला या क्षेत्रातील प्रतिभावान दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती दाखवली होती. या सोहळ्यातील सर्वात आकर्षणाचे नृत्य ठरले नीता अंबानी यांचा डान्स. रघुपती राघव राजाराम हा गीतावर त्यांनी अत्यंत सुरेख डजान्स सादर केला. अनेक नृत्यांगणाच्या साथीने नीता अंबानी या गाण्यावर मुख्य नर्तिका म्हणून नृत्य करताना दिसल्या. यामुळे त्यांच्यात असलेल्या या अनोख्या कलेचे सार्वत्रिक प्रदर्शन घडले.
नीता अंबानींचा डान्सने वातावरण मंत्रमुग्ध- नीता अंबानींचा डान्स पाहून भारतभरातून आलेल्या सेलेब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यांना उभे राहून टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली. उपस्थितांनी दाखवलेले प्रेमा पाहून नीता अंबानीही भारावल्या होत्या. नीता अंबानी यांना भारतीय शास्त्रीय नृत्यकलेची आवड आहे. यामध्ये त्यांनी उत्तम प्रविण्य मिळवले आहे. खरंतर डान्समध्येच त्यांना करियर करण्याची इच्छा होती. परंतु आईच्या इच्छेखातर त्यांनी चार्टड अकाऊंटचे शिक्षण घेतले. नीता अंबानी या प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. कॉलेजच्या दिवसात त्यांनी आपल्या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. आजही त्या दररोज नृत्याचा सराव नियमित करीत असतात.