मुंबई : हॉलिवूड गायक निक जोनास हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ शेअर करत असतो. अलीकडेच निकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो प्लेपेन कसा फोल्ड करायचा हे सांगतो आहे.
मजेदार व्हिडिओ पोस्ट :निक जोनासने इंस्टाग्रामवर पोर्टेबल बेबी प्लेपेन कसा फोल्ड करायचा यावर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याला त्याने 'डॅड स्टफ' असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये निक ब्लॅक हुडी, ग्रे डेनिम आणि ऑरेंज कॅपमध्ये दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला निक सांगतो की तो पोर्टेबल बेबी प्लेपेन फोल्ड करून पॅकेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. यानंतर व्हिडिओमध्ये निक बेबी प्लेपेन (बॉल पिट) फोल्ड करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काही प्रयत्नांनंतर, तो 'हाऊ टू फोल्ड अप अ बॉल पिट' गूगल करतो, जो व्हिडिओ खाली दर्शविला आहे. तो फोल्डिंग तंत्राने प्लेपेन यशस्वीरीत्या फोल्ड करतो.
चाहत्यांना आवडली पोस्ट : निकच्या या पोस्टवर अभिनेता जोनाथन टकरने कमेंट बॉक्समध्ये निकला 'ZADDY' म्हटले आहे. त्याचवेळी एका चाहत्याने 'गुड जॉब डॅडी निक' असे लिहिले आहे. दुसर्या युजरने कमेंट केली, 'मला माहीत नव्हते की आज तुला बॉल पिट फोल्ड करताना पहावे लागेल. अशा छोट्या गोष्टी पाहून खरोखर आनंद होतो. पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद. निकची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे.
2016 मध्ये निक जोनासने पहिल्यांदा साधला प्रियांकाशी संपर्क :निक जोनासने 2016 मध्ये पहिल्यांदा प्रियांकाशी संपर्क साधला होता. प्रियांकाला निकसोबत हे प्रकरण पुढे न्यायचे नव्हते. प्रियांकाने सांगितले की, सुरुवातीला ती निकशी जास्त बोलत नव्हती. प्रियांका म्हणाली - मी 35 वर्षांची होते आणि निक फक्त 25 वर्षांचा होता. सुरुवातीच्या संभाषणानंतर मला हे प्रकरण पुढे न्यायचे नव्हते. असेही तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.
हेही वाचा :Bholaa Box Office Collection Day 1 : भोलाला रामनवमीच्या सुट्टीचा मिळाला नाही लाभ; सरासरी होती पहिल्या दिवसाची कमाई