मुंबई - Priyanka Chopra and Nick jonas:प्रियांका चोप्रा ही नेहमीच मुलगी मालती मेरीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोवर अनेकजण कमेंट करून मालतीचे कौतुक करत असतात. दरम्यान आता प्रियांकाच्या मुलीचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. हे व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहेत. व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा पती निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत मुलगी मालती मेरी देखील दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मालती प्रेक्षकांकडे पाहून हात हलविताना दिसत आहे. त्यानंतर हा कॉन्सर्ट सुरूअसताना मालती तिच्या आईच्या मांडीवर बसलेली आहे. या कॉन्सर्टचा आनंद प्रियांका आणि मालती या मायलेकी घेत आहेत.
पापा निकसाठी मालती बनली चीअरलीडर! :दुसर्या एका व्हिडिओमध्ये, प्रियांका चोप्रानं मालतीसह कॉन्सर्टमध्ये निकला चीअर अप केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मालती तिच्या वडिलांसाठी टाळ्या वाजवताना आणि स्टेजवर त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. निक जोनास जेव्हा तिच्या जवळ येतो तेव्हा ती स्टेजवर त्याच्या मागे जाते. त्यानंतर निक तिच्या कपाळाची किस घेतो आणि प्रियांका ही तिला आपल्या मिठीत घेते. कॉन्सर्टनंतर निक जोनासनं त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमच्या कुटुंबाला कामाच्या दिवशी आणा'. यानंतर त्यानं हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. निकनं शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तो मालतीला कडेवर घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये निक हा आपल्या पत्नी आणि मुलीसह दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये निक हा स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे.