महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka chopra And Nick Jonas : निक जोनास प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर शेअर केली खास फोटो आणि व्हिडिओ... - निक जोनास आणि प्रियांका चोप्रानं शेअर केली फोटो

Priyanka chopra And Nick Jonas : अलीकडेच निक जोनास आणि प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहेत. या फोटोमध्ये एक फोटो खूप क्यूट आहे. हा फोटो कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Priyanka chopra And Nick Jonas
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 1:48 PM IST

मुंबई - Priyanka chopra And Nick jonas :ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा पती निक जोनासनं काही फोटो इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये प्रियंका आणि निकसोबत अभिनेत्री सिमू लिऊ दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांका त्यांच्यासोबत काहीतरी बोलताना दिसत आहे. या पोस्टवर तिनं लिहलं. 'मी काय बोलत आहे ते मलाही कळत नाही', असं तिनं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय निकनं काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोवर त्यानं कॅप्शन दिले, 'सप्टेंबर'.

  • पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मालतीचा एक खूप क्यूट फोटो आहे. या फोटोला चाहते खूप पसंत करत आहेत. या फोटोंद्वारे, निकनं त्याच्या 31व्या वाढदिवसासह सप्टेंबर महिना कसा गेला याची झलक ही चाहत्यांना दाखवली आहे.

निक जोनास आणि प्रियांका चोप्रानं शेअर केली पोस्ट :निकनं रविवारी इंस्टाग्रामवर अनेक फोटो अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्याची पत्नी-अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि त्यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास देखील आहे. या सप्टेंबरमध्ये निकच्या अल्बमच्या पहिल्या फोटोमध्ये, तो त्याचे भाऊ केविन जोनास आणि जो जोनाससोबत एका म्यूजिक कॉन्सर्टमध्ये आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिघांनीही अभिनेता अ‍ॅडम सँडलरसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. त्यानंतर तिसऱ्या फोटोमध्ये प्रियांका अ‍ॅलिसन सुसोबत बोलताना दिसत आहे. यामध्ये सिमू लिऊ आणि निक हे तिच्याकडे पाहत आहेत. याशिवाय निकनं सप्टेंबरमध्येच साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटोही शेअर केले आहेत.

मालती मेरीचा फोटो : निकनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मालती ही एका शेतात कंबरेवर हात ठेवून उभी आहे. तिच्या जवळच्या प्राण्यांकडे पाहत आहे. शेवटच्या फोटोमध्ये निक हा पिवळ्या रंगाच्या पोशाखात आहे. याशिवाय प्रियांकानंदेखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका शेतात हरणासोबत मस्ती करताना दिसत आहे. यासोबत मालती या व्हिडिओमध्ये जंगली प्राण्याकडे पाहत आहे. प्रियांका आणि निक यांनी डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले. जानेवारी 2022 मध्ये, या जोडप्यानं सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीचे स्वागत केले. प्रियांका अलीकडेच 'द रुसो' निर्मित 'सिटाडेल'मध्ये दिसली होती. तसेच पुढे ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बासोबत 'हेड्स ऑफ स्टेट्स'मध्ये दिसणार आहे. बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर प्रियांका फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. Sushant Singh News :'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'ला सात वर्षे पूर्ण, दिशा पटानी सुशांतची आठवण काढत केली पोस्ट
  2. Actress Archana Gautam : अभिनेत्री अर्चना गौतमची काँग्रेसमधून हकालपट्टी, जाणून घ्या कारण
  3. kartik aaryan : काश्मीरच्या बर्फाळ नदीत स्नान करताना कुडकुडतोय कार्तिक आर्यन; पाहा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

...view details