मुंबई - Happy Birthday Parineeti Chopra:बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आज ती आज, 22 ऑक्टोबर रोजी आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अनेकजण तिला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर परिणीतीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये परी आणि प्रियांका खूप खास दिसत आहेत. पोस्टला कॅप्शन देत प्रियांकानं लिहलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा! मला आशा आहे की तू नेहमी आनंदी राहशील. याशिवाय परिणीतीला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.
परिणीती चोप्राला अनेक मुले दत्तक घ्यायची आहेत :परिणीती चोप्राची एक इच्छा आहे की तिला अनेक मुले दत्तक घ्यायची आहेत. एका मुलाखतीत तिनं याबाबत खुलासा केला होता. एका झालेल्या संवादात परिणीतीनं ही इच्छा व्यक्त केली होती. या मुलाखतीत तिला दत्तक मुल घेण्याबाबत विचारण्यात आले, ज्याच्या उत्तरात तिनं म्हटलं, 'मला एक मूल दत्तक घ्यायचे आहे. मला बरीच मुले हवी आहेत, आता मी गरोदर राहू शकत नाही. म्हणून मी काही मुलं दत्तक घेईन. असं तिनं यावेळी सांगितलं होतं. याशिवाय तिला पती कसा हवा आहे याबद्दलदेखील तिनं खुलासा केला होता. परीनं स्वबळावर इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिनं जबरदस्त अभिनय केला आहे.