चेन्नई- दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा दोन मुलांची आई बनली आहे. आपल्याला जुळ्या मुले झाल्याची गोड बातमी चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन यांनी रविवारी दिली. नयनतारा आणि विग्नेश यांनी जून महिन्यात लग्न केले होते. आतापर्यंत त्यांचे हनिमूनचे फोटो पाहात असलेल्या चाहत्यांना या बातमीमुळे गोड धक्का आणि आश्चर्य वाटले आहे.
नयनताराशी लग्न करणाऱ्या शिवनने ट्विटरवर ही बातमी चाहत्यांसह आणि फॉलोअर्ससोबत शेअर केली. तामिळ चित्रपट "थाना सेरंधा कूट्टम", "नानुम राउडीधान" आणि "काथुवाकुला रेंडु काधल" साठी ओळखल्या जाणार्या दिग्दर्शकाने सांगितले की त्यांनी नवजात मुलांची नावे उईर आणि उलागम ठेवली आहेत.