मुंबई -Celebs New year : चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार न्यू इयर साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत. बॉलिवूड ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सनं नवीन वर्षीचं स्वागत केलं आहे . दीपिका पदुकोण, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन, सारा अली खान, मौनी रॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. दीपिका पदुकोणनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात 2023च्या काही विशेष आठवणी आहेत. या व्हिडिओमध्ये ऑस्करसारख्या काही मोठे पुरस्कार सोहळे आणि तिचा 'जस्ट लुकिंग अ व्वा' ट्रेडिंग रील देखील पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर तिनं लिहिलं, '2023 ची एक छोटीशी झलक'. दीपिकानं 'पठाण', 'जवान' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची झलक दाखवून 2023 ला निरोप दिला आहे.
अल्लू अर्जुन शेअर केली पोस्ट : 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुननं 2023 ला निरोप देत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं, मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो जे 2023 मध्ये माझ्या प्रवासाचा भाग होते. हे वर्ष अनेक अर्थानं छान होतं. या वर्षात मी खूप महत्त्वाचं धडे शिकलो आहेत. मनापासून सर्वांचे आभार. 2023 या सुंदर वर्षाला कृतज्ञतापूर्वक निरोप. नवीन वर्षाच्या शुभेच्छा''. अल्लू अर्जुन या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''नवीन वर्षांच्या शुभेच्छा'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''सर तुमचं हे वर्ष चांगलं जावो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा''. अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.