महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

New Tappu's entry in TMKOC : तारक मेहतामध्ये झाली नव्या टप्पूची एन्ट्री, नीतीश भूलानी साकारणार नटखट टप्पू - तारक मेहतामध्ये झाली नव्या टप्पूची एन्ट्री

तारक मेहता का उल्टा चश्माया मालिकेत आता राज अनादकटची जागा नवा टप्पू घेणार असून ही चॅलेंजिंग भूमिका आता नीतीश भूलानी साकारणार आहे. राज अनादकटने तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यानंतर निर्माता लगेचच नव्या टप्पूच्या शोधात जुंपले होते. अनेकांच्या ऑडिशन्स झाल्या आणि अखेर नव्या टप्पूचा शोध नीतीश भूलानीपाशी येऊन थांबला. आता यापुढे एपिसोडमध्ये नीतीश भूलानी टप्पूची नटखट भूमिका करताना दिसणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 11, 2023, 11:31 AM IST

मुंबई- तारक मेहता का उल्टा चश्मा ही विनोदी मालिका गेल्या १५ वर्षापासून प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आली आहे. या मालिकेत कोणीही एक हिरो किंवा हिरॉइन नाही. त्यामुळे यात सामान्य वाटणारे एखादे पात्रही नायकासारखे वावरताना दिसते. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा महत्त्वाच्या आहेत आणि सर्वच लोकप्रियही आहेत. कोणतीही मालिका वर्षानुवर्षे चालत असेल तर कलाकारांची रिप्लेसमेंट हा विषय नक्कीच येतो. त्याप्रमाणे या मालिकेतील अनेक पात्रे ही बदलण्यात आली आहेत.आतापर्यंत तारक मेहतामधील टप्पूची आई म्हणजेच दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, सोढीची भूमिका साकारणारा कलाकार, शैलेश लोढा, नेहा मेहता यांच्यासह अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. या कलाकारांच्या जागी नवीन कलाकारांना अभिनय करण्याची संधी देत निर्मात्यांनी ही मालिका इथंवर आणली आहे. या शोमधील टप्पू ही व्यक्तीरेखा साकारणारा राज अनादकट यांने अलिकडे ही मालिका सोडली होती.

राज अनादकट तारक मेहतातून बाहेर पडणार अशा चर्चा अनेक दिवस सुरू होत्या. अखेर स्वतः राजनेच एक पोस्ट लिहून याचा खुलासा केले. त्याने लिहिले, 'सर्वांना नमस्कार, सर्व प्रश्न आणि तर्कांना विश्रांती देण्याची वेळ आली आहे. नीला फिल्म प्रॉडक्शन आणि तारक मेहता का उल्टा चष्मा यांच्याशी माझा संबंध अधिकृतपणे संपुष्टात आला आहे. मझा शिकण्याचा, मित्र बनवण्याचा आणि काही सर्वोत्तम वर्षांचा हा एक अद्भुत प्रवास आहे. या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो - TMKOC ची संपूर्ण टीम, माझे मित्र, कुटुंब आणि अर्थातच तुम्हा सर्वांचे आभार. शोमध्ये ज्यांनी माझे स्वागत केले आणि माझ्यावर प्रेम केले. 'टपू' माझ्या कलेबद्दलचे तुमचे प्रेम मला नेहमीच तुमच्यापैकी प्रत्येकाला, प्रत्येक वेळी माझे सर्वोत्तम देण्यास प्रवृत्त करते.', असे राज अनादकटने निवेदनात म्हटले होते.

खरंतर जेठालाल आणि दयाबेन यांचा नटखट मुलगा टप्पू हा मालिकेत महत्त्वाचे पात्र आहे. पूर्वी टप्पूची भूमिका भाव्या गांधी साकारत होता. त्यानंतर ही भूमिका राज अनादकटच्या वाट्याला आली. दोघांनीही टप्पूची भूमिका सहज सुंदर अभिनयातून साकारली. आता राज अनादकटची जागा नवा टप्पू घेणार असून ही चॅलेंजिंग भूमिका आता नीतीश भूलानी साकारणार आहे. राज अनादकटने तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यानंतर निर्माता लगेचच नव्या टप्पूच्या शोधात जुंपले होते. अनेकांच्या ऑडिशन्स झाल्या आणि अखेर नव्या टप्पूचा शोध नीतीश भूलानीपाशी येऊन थांबला. आता यापुढे एपिसोडमध्ये नीतीश भूलानी टप्पूची नटखट भूमिका करताना दिसणार आहे.

नवा टप्पू नीतीश भूलानी कोण आहे? - तारक मेहताचा नवा टप्पू कसा अभिनय करतो हे पाहण्यासाठी या मालिकेचे प्रेक्षक उत्सुक आहेत. हा शो त्याच्या भावी कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नीतीश कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा अभिनय करत आहे, असे नाही. त्याने यापूर्वी ‘मेरी डोली मेरे अंगना’ या टीव्ही मालिकेत यापूर्वी काम केले आहे.

हेही वाचा -Sukesh Chandrasekhar Chahat Khanna : टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाच्या अडचणी वाढल्या, सुकेश चंद्रशेखरने पाठवली 100 कोटींची नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details