मुंबई - new poster of Tiger 3 यशराज फिल्म्स बनवत असलेल्या 'टायगर ३' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. कतरिना कैफ आणि सलमान खान यात हातात बंदुक ताणून अॅक्शन मुडमध्ये दिसताहेत. मनिष शर्मा दिग्दर्शन करत असलेल्या हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी केलीय.
यशराज फिल्म्स बनवत असलेल्या गुप्तहेर विश्वातला 'टायगर ३' हा मोठा चित्रपट आहे. टायगर फ्रँचाइजचे आजवर २ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत. 'टायगर'च्या भूमिकेतील सलमान खानला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय. या चित्रपटातही जबरदस्त अॅक्शन, नेत्रदीपक व्हीएफएक्स आणि भरपूर रोमान्स पाहायला मिळणाराहेत
'टायगर 3' चित्रपटाचे निर्माते प्रेक्षकांसाठी भरपूर मोठे सरप्राईज घेऊन येणार असल्याचे आधी सांगण्यात आलंय. या चित्रपटात शाहरुख खान 'पठाण'च्या भूमिकेत एन्ट्री करणारंय. 'पठाण'मध्ये जशी टायगरच्या भूमिकेत सलमानची एन्ट्री होती तशीच आणि त्याहूनही जबरदस्त एन्ट्री शाहरुखची असणार असल्याचे समजतंय. एप्रिल महिन्यात यासाठी शाहरुखने शुटिंगला सुरुवात केली होती. सलमान आणि शाहरुख यांना पडद्यावर एकत्र पाहणे ही चाहत्यांसाठी एक पर्वणी असते आणि हाच अनुभव प्रेक्षक पुन्हा एकदा 'टायगर ३' मध्ये घेतील.
'पठाण' चित्रपटातील एका सीनमध्ये टायगर म्हणतो की तो एका महत्त्वाच्या मिशनवर चाललाय, त्यावेली पटाण म्हणतो की तोही त्याला या मिशनवर भेटेल. एकंदरीत या दोन सुपरस्टारचे एकत्र येणं धमाकेदार असणारंय.
शाहरुख खान आणि सलमान हे बॉलिवूडमध्ये गेली ३ दशके राज्य करत असून त्यांनी 'करण अर्जुन', 'कुछ कुछ होता है' आणि 'हम तुम्हारे हैं सनम'मध्ये स्क्रिन स्पेस शेअर केला होता. आता 'पठाण'नंतर ते पुन्हा एकदा 'टायगर ३' मधील झळकतील.