मुंबई - गायिका फाल्गुनी पाठक ( Falguni Pathak ) नेहा कक्करच्या ( Neha Kakkar ) ओ सजना ( O Sajna ) या आयकॉनिक गाण्याच्या रिक्रिएशनवर खूश नसल्याचे दिसते. अनेक चाहत्यांनी नेहावर मूळ गाणे 'खराब' केल्याबद्दल टीका केली आहे. ओ सजना गाणे नेहाने रिक्रिएट केल्याबद्दल फाल्गुनीनेही नाराजी दाखवल्यानंतर चाहत्यांची टीका वाढली आहे.
90 च्या दशकातील हिट गाण्यामागील मूळ गायिका फाल्गुनीने इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांच्या पोस्ट पुन्हा शेअर केल्या. अप्रत्यक्षपणे नेहाच्या ओ सजना गाण्याचा आवृत्तीबद्दल तिने नापसंती दर्शवली. "कुठपर्यंत जाऊ शकशील नेहा कक्कर? आमच्यासाठी आमचे जुने क्लासिक्स खराब करणे थांबवा. फाल्गुनी पाठक ही ओजी आहे.," फाल्गुनीच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील एका पोस्टमध्ये असे एका चाहत्याने लिहिले आहे.
मूळ गाणे 1999 मध्ये रिलीज झाले होते आणि त्यात अभिनेता विवान भटेना आणि निखिला पालट होते. हे गाणे एका कॉलेज फेस्टमध्ये पपेट शो म्हणून वाजवण्यात आले होते. हे गाणे जबरदस्त हिट झाले होते. नुकतेच या गाण्याच्या नवीन आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.