महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Neha Dhupia : नेहा धुपियाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसोबतचे शेअर केले फोटो - लग्नाचा वाढदिवस

अभिनेत्री नेहा धुपियाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाच्या 5 व्या वाढदिवसानिमित्त पती अंगद बेदीसोबतचे फोटो शेअर केले. यातून तिने पतीबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले आहे.

Neha Dhupia
नेहा धुपिया

By

Published : May 10, 2023, 5:50 PM IST

मुंबई- बॉलिवूड जोडपे नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी 10 मे रोजी त्यांच्या लग्नाचा 5 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त, नेहाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती तिच्या पतीबरोबर जवळीक असणारे फोटो आणि तिच्या मुलांसोबत मस्ती करतांनाची फोटो पोस्ट केले आहे. नेहा आणि अंगद यांच्यात चांगली मैत्री झाली, त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर नेहा आणि अंगदने 2018 मध्ये त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. जेव्हा त्यांनी एका गुरुद्वारामध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले.

लग्नाचा वाढदिवस : लग्नाच्या काही महिन्यांनंतर, या जोडप्याला नोव्हेंबर 2018 मध्ये एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी मेहर ठेवले. तर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना एका मुलगा झाला त्याचे त्यांनी गुरिक ठेवले. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी माय लव्ह आणि हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. काही चाहत्यांनी अभिनंदन केले आहे, तर काहीजणांनी लिहिले, "हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी लव्ह असं लिहून इमोजी पोस्ट केले आहे तर दुसर्‍या काही चाहत्याने लिहिले, 'बॉलिवुडच्या अद्भुत सुपरस्टार्स, प्रेमळ दयाळू लोकांना मदत करणाऱ्या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. त्अयांच्नेया असंख्कय चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट आणि इमोजीचा वर्षाव केला आहे.

चेतन भगत लिखित कॉमेडी ड्रामा : लवकरच हे दोघे चेतन भगत लिखित कॉमेडी ड्रामामध्ये एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. अंगद राघवन रावची भूमिका साकारणार आहे, तर नेहा त्याची पत्नी सावीची भूमिका साकारणार आहे. कोविड-19 लॉकडाऊनच्या अडचणींचा सामना करणाऱ्या विवाहित जोडप्यावर आधारित हा कॉमेडी ड्रामा असणार आहे.

हेही वाचा :Jogira Sara Ra Ra postponed : 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

ABOUT THE AUTHOR

...view details