मुंबई - Ranbir Kapoor birthday : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त रणबीरची आई ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग आणि त्याची बहीण फॅशन डिझायनर रिद्धिमा साहनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू सिंगने रणबीरचे यापूर्वी कधीही न प्रसिद्ध झालेले काही फोटो शेअर केले आहेत. तर रिद्धिमाने रणबीरसोबतचा एक थ्रोबॅक फोटो असलेला सुंदर व्हिडिओ शेअर केला आणि त्यांनी केक कापतानाच्या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले.
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, नीतू सिंगने रणबीर कपूरच्या मध्यरात्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक शेअर केली. फोटोमध्ये लाल गुलाबांच्या पाकळ्या आणि वाढदिवसाचे दोन केक असलेले सुंदर सजवलेले टेबल दिसत आहेत. एका केकवर ‘हॅपी बर्थडे राहा पप्पा’ असे लिहिलंय. टेबलवर रणबीरच्या लग्नाची एक सुंदर छोटी फोटो फ्रेम देखील दिसत आहे.
फोटो शेअर करताना नीतूने लिहिले की, माझ्या सर्वात खास व्यक्तीसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन. तिने दुसऱ्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणबीरचा आणखी एकफोटो शेअर केला आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा या खास माणसाबद्दल कृतज्ञ आहे.'
दरम्यान, रणबीरची बहीण रिद्धिमाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर यापूर्वी न पाहिलेल्या दृश्यांसह एक व्हिडिओ टाकला. यातील काही दृष्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसातील आणि काही रणबीर आणि आलियाच्या लग्नातील आहेत. व्हिडिओ टाकत रिद्धिमाने लिहिले, 'वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रॅन्स! तुझ्या आयुष्यातील हा खास दिवस सुंदर, प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेला जावो. मी तुला कायम त्रास देण्याचे वचन देते. '