मुंबई- कपूर कुटुंबासाठी एक भव्य इमरत निर्माणाधिन असतानाच बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूरने मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. नीतू कपूरने तिची सून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने वांद्रे येथे घर खरेदी केल्यानंतर काही आठवड्यांतच मुंबईत एका नवीन फ्लॅटसाठी 17.4 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे. नीतूचे नवीन नोंदणीकृत अपार्टमेंट वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये, सोफिटेल हॉटेलच्या समोर आणि सनटेक रियल्टीच्या 19 मजली सिग्निया आइल इमारतीच्या सातव्या मजल्यावर आहे.
नीतू कपूरने खरेदी केली आलिशान अपार्टमेंट- मिळालेल्या माहितीनुसार, नीतू कपूर आणि विक्रेता केवल कृष्णन नोहरिया यांनी 10 मे रोजी खरेदीची नोंदणी केली. नीतू यांनी 1.04 कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे. 3,387-स्क्वेअर-फूट अपार्टमेंटमध्ये तीन पार्किंग स्पेस समाविष्ट आहेत. अलीकडेच, नीतूची सून आलिया भट्टने मुंबईतील वांद्रे परिसरात एका फ्लॅटसाठी 37 कोटी रुपये दिले आहेत. फ्लॅटसाठी १० एप्रिल रोजी नोंदणी पूर्ण झाली. पाली हिलच्या वांद्रे परिसरात एरियल व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडच्या सहाव्या मजल्यावर ती आहे. आलियाने तिची बहीण शाहीन हिला त्याच दिवशी जुहूमध्ये दोन अपार्टमेंट्सही गिफ्ट केले.