मुंबई - आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने सोमवारी (२७ जून) गरोदरपणाची गोड बातमी देऊन चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम केले. या आनंदाच्या बातमीनंतर या जोडप्यावर बॉलिवूड आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सध्या या जोडप्याचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान रणबीर आणि आलियाच्या आईने या जोडप्याला आशीर्वाद देतानाचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
आलिया भट्टची आई सोनी राजदान हिने रणबीर आलियाला तिचे फोटो शेअर करून आशीर्वाद दिले आहेत. त्याचवेळी नीतू कपूरने या आनंदाच्या प्रसंगी रणबीर-आलियाचा न पाहिलेला फोटोही शेअर केला आहे. आलिया भट्टने देखील या फोटोला तिचा आवडता फोटो असल्याचे सांगितले आहे. या जोडप्याच्या या गुड न्यूजने संपूर्ण कपूर कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाची लाट उसळली आहे.