महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Neena Gupta : 'बधाई हो' ने माझ्या आयुष्यात क्रांती आणली - नीना गुप्ता - अमिताभ बच्चन

नाट्यक्षेत्रात मातब्बर समजल्या जाणाऱ्या एनएसडी (NSD) म्हणजेच नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी अभिनयक्षेत्रात छोट्या पडद्यावरील खानदान मधून प्रवेश केला. नीना गुप्ता चाणक्य, सांस, डॅडी, मिर्झा गालिब, दर्द सारख्या अनेक मालिकांतून झळकल्या. नुकताच त्यांची भूमिका असलेला 'उंचाई' चित्रपट (Uunchai Movie) प्रदर्शित झाला होता आणि आता एक वेगळ्या धाटणीचा थ्रिलर चित्रपट आला आहे आणि तो म्हणजे वध (Vadh). त्यांनी त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ईटिव्ही भारतसोबत खास गप्पा मारल्या.

Neena Gupta
नीना गुप्ता

By

Published : Dec 9, 2022, 4:11 PM IST

मुंबई :उंचाईच्या वेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना नीना गुप्ता म्हणाल्या, ते ग्रेट आहेत. आजही नवशिक्या अभिनेत्यासारखे त्यांचे वागणे असते. अत्यंत शिस्तप्रिय अभिनेता. शॉट झाल्यावर ते सेटवरच थांबणे पसंत करतात. जास्त बडबड करत नाहीत. परंतु एखादी गोष्ट कथन करू लागले की, ती साभिनय सांगतात. एकदा त्यांना ताप आला होता. ते दिग्दर्शकाला सांगू शकले असते की, शॉट उद्या घेऊया. परंतु त्यांची कमिटमेंट इतकी आहे की सर्वांना शॉट संपल्यावर कळले की अमितजींना ताप आहे. उगीच नाही ते इतक्या उच्च स्थानी विराजमान आहेत. मी एका चित्रपटाचे शूटिंग करत होते.


महिला पत्रकारांसोबत बोलायला जास्त आवडते : खरंतर मला इंटरव्ह्यू वगैरे द्यायला आवडत नाही. पण ते माझे काम आहे. मला एकाच वेळेस खूप मुलाखती देण्याचा खरंच कंटाळा येतो. कारण दिवसभर अनेकांसोबत फक्त तेच तेच बोलल्यावर आणखी काय होणार? पणा मला महिला पत्रकारांसोबत बोलायला जास्त आवडते. त्या मुलाखतीदरम्यान काही खाजगी गोष्टी शेयर करतात ज्यांच्याशी मी रीलेट करू शकते. पूर्वीच्या काळी मात्र मी महिला जर्नलिस्टना घाबरत असे. तो काळच तसा होता आणि काही महिला फिल्म पत्रकार खतरनाक होत्या, असे नीना गुप्ता दिलखुलासपणे सांगत होत्या.


तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो : त्या पुढे म्हणाल्या की, माझा या शुक्रवारी प्रदर्शित होणारा चित्रपट 'वध' अत्यंत वेगळ्या धाटणीचा थ्रिलर आहे. मी आणि संजय मिश्रा यात प्रमुख भूमिकेत आहोत. मला संजय संजय मिश्रा यांच्या सोबत काम करण्याची इच्छा होतीच. एका वयस्क मध्यमवर्गीय जोडप्याची कथा आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे. त्याला तिथे पाठविण्यासाठी वडिलांनी लोन घेतले आहे. मुलगा काही पैसे पाठवत नाही. त्यामुळे ते लोन व्याजासकट फेडताना नाकीनऊ येते. शिकवणी करून पोट भरता येत असले तरी व्याजावर व्याज चढत जात असल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. कारण वसुलीसाठी येणारा सतत अपमान करत असतो. त्यातच काही अघटीत घडते आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते.

वध चित्रपट

हत्या आणि वध यातील फरक : चित्रपटातून ते कसे मार्गक्रमण करतात हे रोमांचक आणि रहस्यमय आहे. हत्या आणि वध यातील फरक काय हे हा चित्रपट सांगतो. माझी अशी इच्छा आहे की, सर्वांनी हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघावा. कारण अनेकांचे असे मत आहे की मला आणि संजय सरांना म्हणाव्या तशा संधी मिळाल्या नाही. तर हा चित्रपट त्याचे उत्तर आहे. तसेच या चित्रपटाला पाठिंबा मिळाला तर आम्ही आणि निर्माते अशा पद्धतीचे चांगले चित्रपट तुमच्यासाठी घेऊन येई शकतो. नीना गुप्ता यांना 'बधाई दो' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री साठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. त्यांची अभिनयाची सेकंड इनिंगची गाडी सध्या सुसाट धावत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details