मुंबई -Nayanthara : नयनतारा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 'जवान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नयननं इंस्टाग्रामवर एन्ट्री घेतली होती. नेहमीप्रमाणे नयन ही सोशल मीडियापासून दूर राहते. ती जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरीही, विघ्नेश शिवन हा अनेकदा नयनशी संबंधित सर्व गोष्टी इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. दरम्यान आता नयनतारा आणि विघ्नेश शिवननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नयन आणि विघ्नेश हे दोघेही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. स्विमिंग पूलमध्ये नयन ही तिच्या स्टाईलमध्ये आहे. तिनं पॅन्ट आणि शर्ट घातलेला आहे.
नयनताराची क्रेझ : नयनतारा ही अनेकदा आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवताना दिसते. याशिवाय ती आपल्या जुळ्या मुलांसह खेळताना दिसते. नयननं 'जवान' या चित्रपटातूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नयनची क्रेझ आणि फॅन फॉलोइंग फक्त साऊथमध्ये होती, मात्र आता तिचे बॉलिवूडमध्ये देखील अनेक चाहते झाले आहेत. 'जवान' चित्रपटामध्ये तिनं चांगला अभिनय केला आहे. नयनला बॉलीवूडच्या ऑफर्स मिळतील असं सगळ्यांना वाटतं, पण ती आवडणाऱ्या भूमिकाच निवडते. दरम्यान आता ती चिरंजीवीसोबत तेलुगू चित्रपटामध्ये काम करणार असल्याच्या अफवा आहेत.