महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Nayanthara : नयनतारा आणि विघ्नेशनं क्वालालंपूरमध्ये साजरा केला आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस... - first Birthday

Nayanthara : दक्षिणेतली सुपरस्टार नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश त्यांच्या जुळ्या मुलांसह मलेशियातल्या क्वालालंपूरमध्ये सुट्टीचा आनंद उपभोगतायत. या दाम्पत्यानं उइर आणि उलग या जुळ्या मुलांचा पहिला यांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी 'डेस्टिनेशन' ठरवून ठेवलं होतं. नयनतारा-विघ्नेशनं मुलांच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

Nayanthara
नयनतारा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 12:15 PM IST

मुंबई -Nayanthara : साउथ अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांची जुळी मुले उइर आणि उलग 26 सप्टेंबर रोजी एक वर्षाची झाली. हे जोडपं आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मलेशियातील क्वालालंपूरमध्ये गेलं आहेत. याशिवाय हे कपल मलेशियामध्ये त्यांचा स्किनकेअर ब्रँड लॉन्च करणार आहे. दरम्यान नयनतारानं आपल्या मुलांसोबतचे पेट्रोनास टॉवर्ससमोरचा फोटो शेअर केला आहे. नयनतारा आणि विघ्नेश शिवन हे 2022 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले. सध्या नयन ही 'जवान' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

नयनतारानं शेअर केला फोटो : फोटो शेअर करत नयनतारानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या ट्विनपॉवर तुम्हालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आनंदाचे, आशावादाचे आणि स्मितांचे वर्ष' माझ्या प्रिय उइर आणि उलग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही दोघेही या आयुष्यात तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी खूप आनंद घेऊन उभे रहा. माझ्या मुलांनो, अम्मा आणि अप्पा तुमच्यावर प्रेम करतात. या उंच शक्तिशाली टॉवर्सजवळ तुमचा पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे, तो इतक्या चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल देवाचे आभार.

'जवान'नंतर नयनताराला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स : विघ्नेश शिवन आणि नयनतारा हे दोघेही 2015 मध्ये 'नानुम राउडी धन'च्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले होते. या जोडप्यांनी मार्च 2021 मध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. जून 2022 मध्ये, महाबलीपुरममध्ये हा विवाहसोहळा पार पडला. ऑक्टोबर 2022 मध्ये, विघ्नेशनं जाहीर केले की त्याने आणि नयनताराने आपल्या जुळ्या मुलांचं (सरोगसीमार्फत) स्वागत केलं आहे. 'जवान'नंतर नयनताराला अनेक चित्रपटाचे ऑफर्स मिळतायत. या चित्रपटानं जगभरात 1000 कोटींचा पल्ला पार केला आहे. याशिवाय या चित्रपटानं देशांतर्गत 570 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट देशांतर्गत 600 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तसेच 'जवान'नं आतापर्यत सर्वच हिंदी चित्रपटांचे उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडले आहेत.

हेही वाचा :

  1. Aamir Khan At Ganpati Pooja: आमिर खाननं आशिष शेलारांच्या घरी केली गणपतीची पूजा
  2. Tumse Na Ho Payega screening : 'तुमसे ना हो पायेगा'च्या स्क्रिनिंगला कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची हजेरी - पाहा व्हिडिओ
  3. Shantit Kranti web series :'शांतीत क्रांती' मालिकेचा ट्रेलर रिलीज... पाहा, तीन मित्रांच्या बॅलचर ट्रीपची धमाल

ABOUT THE AUTHOR

...view details