महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Nayanthara and Vignesh shivan : नयनतारा आणि विघ्नेश शिवननं केलं ब्युटी ब्रँड लॉन्च; फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - नयनतारा आणि विघ्नेश लॉन्च केला स्किन केअर ब्रँड

Nayanthara and Vignesh shivan : साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी स्किन केअर ब्रँड लॉन्च केलं आहे. या स्किन केअर ब्रँडच्या जाहिरातीत नयनतारा ही झळकत आहे. या जोडप्यानं इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Nayanthara and Vignesh shivan
नयनतारा आणि विघ्नेश शिवन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 1:57 PM IST

मुंबई - Nayanthara and Vignesh shivan :शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी साऊथ अभिनेत्री नयनतारा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'जवान' यशामुळे नयनतारालाही खूप फायदा झाला आहे. तिला सध्या अनेक चित्रपटाच्या ऑफर मिळत आहेत. नयनताराची बॉलिवूड एंट्री खूप हिट ठरली आहे. 'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. 'जवान'च्या रिलीजच्या एक दिवस आधी नयनतारानं इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं होतं. अलीकडेच तिनं तिच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस पती विघ्नेश शिवनसोबत साजरा केला. या कार्यक्रमामधील फोटोही या जोडप्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नयनतारा आणि विघ्नेश शिवन

नयनतारा आणि विघ्नेश लॉन्च केला स्किन केअर ब्रँड : नयनतारा आणि विघ्नेशनं पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केली आहेत. या फोटोमध्ये दोघेही त्यांचे स्किन केअर ब्रँड लॉन्च करताना दिसत आहे. या स्टार कपलनं त्यांच्या ब्रँडबद्दल अधिकृत घोषणा केली यासोबतच त्यांनी चाहत्यांना सूचित केले की, त्यांच्या उत्पादनाची विक्री 29 सप्टेंबर रोजी थेट वेबसाइटवर होईल. हे जोडपे रविवारी, 24 सप्टेंबर रोजी मलेशियामध्ये होते. नयनतारानं तिच्या स्किनकेअर ब्रँडची जाहिरात देखील केली आहे. या जाहिरातीत ती खूप खास दिसत आहे. या जोडप्यानं सिंगापूर आणि मलेशियामध्ये काही उद्योजकासोबत भागीदारी केली आहे. हे जोडपे ब्रँड लॉन्च करण्यासाठी सिंगापूर आणि मलेशियामध्ये गेले होते.

नयनतारा आणि विघ्नेशनं शेअर केले फोटो आणि व्हिडिओ : विघ्नेशनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहलं, आमच्याकडे एक धोरणात्मक योजना आहे. माझा धडाकेबाज जोडीदार, माझ्या जीवनसाथी आणि माझ्या बिजनेस पार्टनरवर खूप प्रेम ! लव्ह यू माय थंगम. असं त्यानं कॅप्शन देत नयनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे. त्यानंतर नयनतारानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करून तिच्या पतीवर प्रेमाचा वर्षाव केला. नयनतारानं आपल्या पतीला नवीन सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. Anushka Sharma Pregnant ? : विराट कोहलीच्या घरी पुन्हा हलणार पाळणा, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई
  2. Preity Zinta with twins : जुळ्या मुलांसोबत प्रिती झिंटाची 'जादुई' बीच डेट, पाहा फोटो
  3. Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'चंद्रमुखी 2' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

ABOUT THE AUTHOR

...view details