महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Cannes 2023 : कान्समध्ये पैसे घेऊन चित्रपट दाखवले जातात, नवाजुद्दीचे धक्कादायक वक्तव्य - click photos at Cannes

नवाजुद्दीन सिद्दीकीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर टीका केली आहे. इथे पैसे देऊन चित्रपट दाखवली जातात, असे त्याने धक्कादायक वक्तव्य केले.

Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी

By

Published : May 26, 2023, 6:14 PM IST

मुंबई :फ्रान्सच्या कान्स शहराच्या किनारी भागात असलेल्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये ७६व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बऱ्याच भारतातील अभिनेत्रींनी कान्समध्ये पदार्पण केले आहे. त्याच वेळी, आता या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीनकडून प्रतिक्रिया आली आहेत. नवाजने ही कमेंट थेट अनुराग कश्यपच्या 'केनेडी' चित्रपटावर केल्याचे दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नवाजुद्दीनचं हे वक्तव्य आश्चर्यचकित करणारे आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने स्पष्टपणे सांगितले आहे की, इथे आपल्याच लोकांना ऑडिटोरियम भाड्याने घेऊन चित्रपट दाखवले जातात आणि मग नंतर म्हणतात की आमचा चित्रपट कान्समध्ये प्रदर्शित झाला. असे नवाजने वक्तव्य केल्यानंतर अनेकजणांना धक्का पोहचला आहे.

कान्सबद्दल बोलतांना : आतापर्यत, नवाजुद्दीनचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 9 चित्रपट दाखवण्यात आले आहेत. अभिनेत्याचा पहिला चित्रपट मिस लव्हली (२०१२) कान्स येथे प्रदर्शित झाला. तेव्हापासून, द लंचबॉक्स, मंटो आणि मान्सून शूटआऊट सारखे अभिनेत्याचे चित्रपट कान्समध्ये प्रदर्शित झाले आहेत. अभिनेत्याने सांगितले की त्याचे सर्व चित्रपट अधिकृतपणे निवडले गेले होते.

कान्सवर नवाजुद्दीन काय म्हणाला? :मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत नवाजुद्दीन म्हटले, तुमचा चित्रपट अधिकृतपणे कान्ससाठी निवडला जाऊ शकत नाही, परंतु तुम्ही तुमचा चित्रपट येथे घेऊ जाऊ शकता, येथे काही ऑडिटोरियम आहेत, जी भाड्याने दिली जाऊ शकतात, ऑडिटोरियमच्या मालकाला पैसे द्या आणि रेड कार्पेटवर फिरा, त्यानंतर तुम्ही तुमच्या लोकांना आणा, फोटो काढा आणि तुमच्याच लोकांना चित्रपट दाखवा आणि मग परत या आणि सांगा की आमच्या चित्रपटाची निवड कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली. नवाजने पुढे म्हटले, 'मला अजूनही समजत नाही की यातील अर्धे लोक इथे का जातात, आम्ही तिथे असताना लोक म्हणायचे 'तुम्ही इथे कसे आणि का आलात?' आम्ही त्यांना सांगायचो की आमच्या चित्रपटाने आम्हाला इथे आणले आहे, तिथेल लोक आम्हाला विचारायचे कुठे आली आहे तुमची चित्रपट त्यावर आमच्याकडे काही उत्तर नसायचे.कान्सला जाण्याचा अर्थ असा नाही की तुमचा चित्रपट हिट होईल, असेही नवाज म्हणाला. ते केवळ प्रचाराचे साधन आहे. अभिनेत्याने सांगितले की, मिस लव्हली हा चित्रपट कान्सला जाऊनही चालला नाही. नवाजने कान्स फिल्म फेस्टिव्हलचे वर्णन 'सिनेमाचा मक्का' असे केले आहे.

हेही वाचा :Ileana D'Cruz baby bump : इलियाना डिक्रूझने तिच्या बेबी बंपचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले

ABOUT THE AUTHOR

...view details