मुंबई- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. आज त्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. पण एक काळ असा होता की अतिशय छोट्या भूमिकेसाठीही तो प्रॉडक्शन हाऊसच्या चक्करा मारत असे. यापूर्वी त्याने अनेक मुलाखतीत याबद्दलचे किस्से सांगितले आहेत. अलिकडेच त्याने यापैकी एक किस्सा सांगितला ज्यामुळे सर्वजण चकित झाले आहेत.
राम गोपाल वर्मा निर्मिती 'शूल' या चित्रपटातही नवाजुद्दीनने एक छोटी भूमिका केली होती. या चित्रपटात मनोज बाजपेयी आणि रवीना टंडन रेस्टॉरंटमध्ये बसले असताना त्यांची ऑर्डर घेण्यासाठी जो वेटर येतो तो नवाजुद्दीन होता. या छोट्या भूमिकेसाठी त्याला अडीच हजार रुपये मानधन मिळणार होते. सिनेमा पूर्ण झाला, पण त्याला त्याचे पैसे काही मिळाले नाहीत. पण कलंदर नावजुद्दीने हे पैसे आपल्या अनोख्या स्टाईलने वसुल केले. हा किस्सा त्याने अलिकडेच एका आघाडीच्या मनोरंजन माध्यमाला मुलाखत देताना सांगितला.
नवाजुद्दीनने नुकतेच उघड केले की त्याला चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी 2,500 देण्याचे वचन दिल्यानंतरही मोबदला मिळाला नाही आणि आजपर्यंत ती रक्कम मिळालेली नाही. पैसे गोळा करण्यासाठी सतत सहा ते सात महिने प्रॉडक्शन ऑफिसला भेट दिल्यानंतर कोणालाही सुगावा न लागता तो वसूल करण्याचा चतुर मार्ग सापडल्याची आठवण त्याने सांगितली.
नवाजुद्दीन म्हणाला, "माझ्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका आहेत, त्यापैकी अनेकांबद्दल मी लोकांना सांगत नाही, पण मी तिथे आहे. मला पैशांची गरज होती, ते जगण्याचे साधन होते. म्हणून मी यात भूमिका केल्या. शूलमधला एक वेटर जो मनोज बाजपेयी आणि रवीना टंडन यांच्याकडून ऑर्डर घेतो. या भूमिकेसाठी ते म्हणाले की मला 2,500 देतील, पण मला ते कधीच मिळालेले नाहीत. अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, पण ही गोष्ट मला चांगलीच आठवते."
तो पुढे म्हणाले, " अडीच हजारसाठी ६ - ७ महिने ऑफिसच्या चक्करा मारत होतो. पैसे मिळाले नाही पण जेवण मिळाले. मग चलाखी केली की मी बरोब्बर जेवणाच्यावेळी तिथे पोहोचत असे. माझी अवस्था बघून ते म्हणायचे जेवणार का? मी होय म्हणालो. पैसे तर मिळणार नाहीत पण जेवायसाठी येत जा, असे त्यांनी म्हटले. मी म्हटलं ठीक आहे. असा तऱ्हेने मी एक दीड महिना रोज जेवण केले आणि माझा पैसे वसूल केले.''
नवाजुद्दीन लवकरच ''हिरोपंती 2'' मध्ये दिसणार आहे, ज्यात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायगरच्या डेब्यू फिल्म ''हिरोपंती''चा सिक्वेल आहे. या चित्रपटात नवाजने लैला नावाच्या भयानक गुन्हेगाराची भूमिका केली आहे. हा चित्रपट 29 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
हेही वाचा -Kangana Ranaut Reveals :'लॉक अप'मध्ये कंगना राणौतचा मोठा खुलासा, म्हणाली 'तो स्पर्श करायचा आणि कपडे काढा म्हणायचा'