मुंबई : 'द कश्मीर फाइल' आणि 'द केरळ स्टोरी' सारख्या चित्रपटांच्या यशासाठी आवश्यक असलेला प्रचार लक्षात घेऊन आता प्रसिद्ध चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील चित्रपट 'जोगिरा सारा रा रा'च्या प्रमोशनसाठी मंगळवारी इंदूरमध्ये पोहोचला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंदूरला पोहोचलेल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, जर चित्रपटाचे प्रमोशन केले नाही तर सध्याच्या काळात चित्रपट चालवणे फार कठीण आहे. म्हणूनच चित्रपट चालवण्यासाठी प्रत्येक चित्रपटाचे प्रमोशन करणे फार महत्त्वाचे असते. 'जोगिरा तारा रा रा' या चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री नेहा शर्मा ही देखील यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली. यावेळी नवाजने अनेक विषयांवर आपले खुले मत यावेळी व्यक्त केले.
'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटाचे प्रमोशन : यादरम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ज्या ठिकाणी प्रमोशनसाठी गेला होता. त्या ठिकाणी फार प्रेक्षक आले नव्हते. त्यामुळे यावेळी नवाज हा नाराज दिसला. तो म्हणाला, आजकाल प्रेक्षक चित्रपट पाहायला का येत नाहीत, जर असेच चालू राहिले तर सिनेमा संपेल. माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा इतर काही कारण असेल तर मला माफ करा मात्र सिनेमा पाहयला जावे, असे त्याने सांगितले. त्याच्या अभिनयाच्या तुलनेत इतर कोणत्याही अभिनेत्याच्या प्रश्नावर त्याने म्हटले की, 'मी साऊथचा सुपरस्टार कमल हासनचा चाहता आहे. जेव्हाही मी त्यांची कामगिरी पाहतो तेव्हा मी थक्क होतो. असे त्याने सांगितले.