महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नवाजुद्दीन सिद्दीकी हड्डीमध्ये साकारतोय ट्रान्सजेंडरची भूमिका - नवाजुद्दीनच्या व्यक्तिरेखेचा खुलासा

नवाजुद्दीन सिद्दीकी याची भूमिका असलेल्या आगामी 'हड्डी' या चित्रपटात आता नवाजुद्दीनच्या व्यक्तिरेखेचा खुलासा झाला आहे. या चित्रपटात नवाज एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी
नवाजुद्दीन सिद्दीकी

By

Published : Nov 18, 2022, 9:50 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा सशक्त अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची भूमिका असलेल्या आगामी 'हड्डी' या चित्रपटाची घोषणा यावर्षी 23 ऑगस्ट रोजी करण्यात आली. पुढील वर्षी (2023) हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचेही सांगण्यात आले. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली आणि एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये नवाजुद्दीन एका सुंदर महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. आता नवाजुद्दीनच्या व्यक्तिरेखेवरून पडदा उचलण्यात आला आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो समोर आली आहेत. या चित्रपटात नवाज एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.

नवाजुद्दीनने स्वतः शेअर केले फोटो- नवाजुद्दीन सिद्दीकीने 'हड्डी' चित्रपटातील त्याचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो तृतीयपंथी म्हणून उभा दिसत आहे. अभिनेत्याच्या आजूबाजूलाही तेच लोक आहेत. हे फोटो शेअर करत नवाजुद्दीनने लिहिले आहे की, 'सेटवर ट्रान्सजेंडर समुदायासोबत काम करण्यापासून ते भूमिका साकारण्यापर्यंत.... 'हड्डी'च्या शूटिंगचा अनुभव सर्वांसाठीच अद्भुत होता.

ट्रान्सजेंडर लूकमध्ये नवाजुद्दीन- नीट बघितलं तर हे पात्र नवाजला हुबेहुब दर्शवत आहे. त्याच्या लूकमध्ये अजिबात कमतरता नाही. नवाजुद्दीन एका तृतीयपंथीच्या लूकमध्ये पूर्णपणे मग्न दिसत आहे.

यापूर्वी व्हिडिओ शेअर केला होता- या वर्षाच्या सुरुवातीला 23 ऑगस्ट रोजी अभिनेत्याने चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नवाजने सिल्व्हर कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. यात तो आपले हायलाइट केलेले केस उघडे ठेवून चादरीवर बसलेला दिसला. हा चित्रपट झी स्टुडिओच्या बॅनरखाली बनत असलेला रिव्हेंज ड्रामा चित्रपट असेल. नवाजुद्दीन सिद्दीकीने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, इतका चांगला गुन्हा यापूर्वी कधीच पाहिला नाही.

अक्षत अजय शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अक्षतने आदिम भल्लासोबत चित्रपटाची कथा लिहिली आहे. अक्षतने याआधी नवाजसोबत वेब सीरिजमध्ये दुसरा युनिट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर अक्षतने AK vs AK मध्ये देखील काम केले आहे. त्याचवेळी अक्षतने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेजर' चित्रपटासाठी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाचे शूटिंग उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादसह पश्चिम उत्तर प्रदेशात सुरू आहे.

याआधी नवाजुद्दीन सिद्दीकी टायगर श्रॉफ स्टारर 'हिरोपंती-2' या चित्रपटात लैला सरनच्या खतरनाक पात्रात दिसला होता. मात्र, चाहत्यांना नवाजचा लूक आणि कॅरेक्टर फारसे आवडले नाही. आता नवाज हड्डी या चित्रपटात एका महिलेचे रूप धारण करणार आहे.

हेही वाचा -'अ‍ॅक्शन हिरो': आयुष्मान खुराना, नोरा फतेहीचा आयटम नंबर 'जेहदा नशा'ने झिंग वाढल

ABOUT THE AUTHOR

...view details