महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

National girlfriends day 2023 : 'तमाशा' ते 'कुछ कुछ होता है' पर्यंत, तुमच्या गर्लफ्रेंडसोबत पाहा हे खास हिंदी चित्रपट... - गर्लफ्रेंडसोबत पाहा ५ चित्रपट

१ ऑगस्ट रोजी नॅशनल गर्लफ्रेंड दिवस आज अनेक तरुण आणि तरुणी साजरा करत आहेत. या खास दिवशी तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडसोबत पाहू शकता हे ५ चित्रपट.

National girlfriends day 2023
नॅशनल गर्लफ्रेंड दिवस २०२३

By

Published : Aug 1, 2023, 2:43 PM IST

मुंबई : दरवर्षी १ ऑगस्ट रोजी नॅशनल गर्लफ्रेंड दिवस साजरा केला जातो. या दिवशी अनेक तरुण आणि तरुणी एकत्र येऊन आपल्या जोडीदाराला वेळ देतात. तसेच काही कपल हा दिवस कुठे बाहेर जाऊन साजरा करतात किंवा कोणी आपल्या गर्लफ्रेंडला खास भेटवस्तू देऊन खूश करतात. गर्लफ्रेंडसाठी भेटवस्तू शोधण्यासाठी अनेक मुलांना अडचणी येतात. दरम्यान इतका वेळ भेटवस्तूवर खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसाठी काही विशेष करू शकता. तुम्ही तुमच्या घरात चित्रपटाची तारीख प्लॅन करून चांगले रोमँटिक बॉलीवूड चित्रपट पाहू शकता. याशिवाय चित्रपट बघतांना तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसाठी चायनीज ऑर्डर करून चित्रपटाचा आनंद घेवू शकता. बॉलीवूडमधील ५ रोमँटिक चित्रपट गर्लफ्रेंडसोबत या दिवशी तुम्ही पाहू शकता.

तमाशा : इम्तियाज अली दिग्दर्शित हा अलीकडच्या काळातील सर्वात रोमँटिक बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर अभिनीत, हा चित्रपट वेद आणि ताराच्या कहाणीच्या भोवती फिरणारा आहे. हा चित्रपट खूप जबरदस्त असून या चित्रपटामधील गाणे खूप खास आहेत. या चित्रपटामध्ये रणबीर आणि दीपिकाने खूप चांगला अभिनय केला आहेत.

ये जवानी है दिवानी : अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. 'ये जवानी है दिवानी' चित्रपट 'तमाशा'पूर्वी रिलीज झाला होता. 'ये जवानी है दिवानी'मध्ये आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे कहाणी मनालीमधील शाळेच्या बॅचचे पुनर्मिलन आणि त्यातून त्यांच्या आयुष्यात येणारे अडचणी भोवती फिरणारी आहे.

लव पर स्क्वायर फुट : विक्की कौशल आणि अंगिरा धर यांच्या प्रमुख भूमिका असलेला, 'लव्ह पर स्क्वेअर फूट' हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटात विक्की (संजय) आणि अंगिरा (करीना ) हे मुंबईत एका उच्चभ्रू अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे पहिले घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. या दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला होता.

जब वी मेट :इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटात करिना (गीत) आणि शाहिद कपूर ( आदित्य) हे दोघे एका ट्रेनमध्ये भेटतात. आदित्य हा त्याच्या आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करत असतो म्हणून तो नारज असतो. त्यानंतर गीत त्याला सहाभूती देण्याच्या भानगडीत आपली ट्रेन मिस करते त्यानंतर चित्रपटाची खास कहाणी सुरू होते. करीना कपूर आणि शाहिद कपूर अभिनीत, हा चित्रपट बॉक्स ऑफिवर खूप हिट झाला होता.

कुछ कुछ होता है :करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान (राहुल) , काजोल देवगन (अंजलि) आणि राणी मुखर्जी (टिना) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये राहुल, अंजलि आणि टीना हे चांगले मित्र असतात. मात्र या तिघांमध्ये लव्ह ट्रांगल होते. त्यानंतर राहुल हा गर्लफ्रेंड टीनासोबत लग्न करतो मात्र काही दिवसानंतर त्यांची पत्नी मरते त्यानंतर त्याच्या आयुष्यात अचानक त्यांच्या बेस्ट फ्रेंडची एंन्ट्री होती ही बेस्ट फ्रेंड अंजली असते. त्यानंतर राहुल आणि अंजलीचे नाते कसे लग्नामध्ये परिवर्तीत होते हे या चित्रपटाची कहानी आहे.

हेही वाचा :

  1. Seema Haider : सीमा हैदरला चक्क चित्रपटात भूमिकेची ऑफर, जाणून घ्या कोण देतय संधी
  2. Taapsee Pannu Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला चित्रपट फ्लॉप दिल्यानंतरही तापसी पन्नूने कमविले नाव....
  3. Mrunal Thakur Birthday : छोट्या पडद्यापासून सुरुवात केल्यानंतरही मृणाल ठाकूर गाजवत आहे बॉलिवूड चित्रपटसृष्टीत राज्य....

ABOUT THE AUTHOR

...view details