मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात मोठा पुरस्कार आहे. ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार आहेत. यावेळी नॅशनल अवॉर्डमध्ये साऊथ सिनेमांचा दबदबा पाहायला मिळणार आहे. कंगना रणौत, आलिया भट्ट आणि जोजू जॉर्ज हे देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. कोरोनामुळे २०२१ मधील अवार्ड हे २०२३ मध्ये देण्यात येणार असून यामध्ये २०२१ मधील प्रदर्शित झालेले चित्रपट नॉमिनेट झाले आहेत. विजेत्यांची नावे आज सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कधी आणि कुठे पाहता येईल याविषयी जाणून घेऊया....
शर्यतीत मल्याळम चित्रपट : यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये साऊथचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, रामचरण, ज्युनियर एनटीआरसारखे अनेक मोठे साऊथ स्टार्स बेस्ट अॅक्टरच्या शर्यतीत पुढे आहेत. त्याचबरोबर मल्याळम चित्रपट 'नायट्टू' अभिनेता जोजू जॉर्ज सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
हिंदी चित्रपट : हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे तर आर माधवन दिग्दर्शित 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'लाही अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार मिळू शकतात. त्याचबरोबर माधवनही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. तर आणखी एक साऊथ चित्रपट 'मिनल मुरली' देखील अनेक श्रेणींमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.