मुंबई - मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने मंगळवारी जाहीर केले की राष्ट्रीय सिनेमा दिवस ( National Cinema Day ) 16 सप्टेंबरला नव्हे तर 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त, PVR, INOX, Cinepolis, Carnival आणि Delight यासह देशभरातील 4,000 हून अधिक स्क्रीनवर 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
एका निवेदनात एमएआयने म्हटले आहे की, अनेक भागधारकांच्या विनंतीनुसार आणि लोकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी, राष्ट्रीय चित्रपट दिन 16 सप्टेंबरला नव्हे तर 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. यापूर्वी, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घोषित केले होते की 16 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाईल.
अशा प्रकारे यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात नव्हता. यंदा हा ट्रेंड नव्याने सुरू झाला आहे. कोविडमुळे थिएटर्स दोन वर्षे बंद पडलेली होती. दोन वर्षानंतर नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जात आहे. चित्रपटगृहांनी केलेली ही घोषणा लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात न गेलेल्या प्रेक्षकांना परत आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.